India Morning News
कन्हान : – कन्हान पोलीस स्टेशन हद्दीतील डुमरी खुर्द चैतन्य राईस मिलला माथेफिरू अज्ञात व्यक्तीने आगीच्या स्वाधीन केले . आगीत लाखो रुपयांचे नुकसान झाल्याने पोलीसांनी गुन्हा दाखल केला आहे .
पोलिसांन कडुन मिळालेल्या माहिती नुसार , सुर्यभगवान सुभ्रमन्य टोन्टेन्पु उमर (६९) रा.डुमरी खुर्द हे १६ वर्षापासुन मुलगा आणि पुतण्या सोबत एकत्र मिळुन राईस मिल चालवत आहे . रविवार ( दि.२२) जुन रोजी सकाळी ५:३० वाजता च्या दरम्यान राईस मिल मध्ये काम करणारा मजदुर शंकर ऋषीदेव याने सुर्यभगवान यांना सांगितले की , राईस मिलच्या ऑफिस कार्यालयातुन आगीचा धुर निघत आहे . सुर्यभगवान आणि रंगराव दोघेही मिल मध्ये गेल्यावर कार्यालयातुन धुर निघत होता . कार्यालयाचा दरवाजा बंद असल्याने दरवाजा चाबीच्या सहाय्याने उघडून आग आटोक्यात आणली . राईस मिल कंपनीचे मालक सुर्यभगवान उमर आणि इतर लोकांनी कंपनी मध्ये लावलेल्या सीसीटीवी कैमरे ची पाहणी केली असता पहाटे चार ते पाच वाजता च्या दरम्यान , एक अज्ञात व्यक्तीने कार्यालयाच्या मागील दरवाजाचे कुलूप तोडताना आणि डोक्यावर रिकामी पिवळी प्लास्टिकची पिशवी ठेवून आपली ओळख लपवताना दिसुन आला . त्याने आंगात काळी फुल पँट , सिमेंट फुल शर्ट आणि काळा दुपट्टा आणि काळे बूट घातलेले दिसले . त्याने कार्यालयाच्या पूजा मंदिरातून तेल आणि माचीसच्या काड्या घेऊन अज्ञात व्यक्तीने ओळख लपवून ऑफिसला हानी पोहोचवण्याच्या उद्देशाने कार्यालयातील वस्तूंना जाणूनबुजून आग लावली . आगीत डेल कंपनीचा पीसी मॉनिटर, दोन प्रिंटर एचपी कंपनीा, जिओ नेट कनेक्शन बाॅक्स, लाकडी दोन टेबल , एक कुलर व दोन फैन , एक सीसीटीवी कैमरा असा एकुण १,०८,५०० रुपयांचा मुद्देमाल जळुन खाक झाल्याने पोलीसांनी सुर्यभगवान उमर यांचा तक्रारी वरून अज्ञात आरोपी विरुद्ध गुन्हा दाखल करून पुढील तपास पोलीस निरीक्षक राजेंद्र पाटील यांचा मार्गदर्शनात सहायक पोलीस निरीक्षक राहुल चव्हाण करीत आहे .






Comments are closed