India Morning News
पुणे: व्यापारी वर्गाच्या कल्याणासाठी केंद्र आणि राज्य सरकारतर्फे राबविल्या जाणाऱ्या विविध योजनांची सखोल माहिती देणारे ‘योजनापर्व 3.0’ हे पुस्तक व्यापारी मित्र, पुणे यांच्या वतीने राज्यसभा खासदार मेधा कुलकर्णी यांना भेट म्हणून सादर करण्यात आले. या पुस्तकाचे प्रकाशन महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते नुकतेच पार पडले.
या पुस्तकात मुद्रा योजना, विश्वकर्मा योजना, उद्योगिनी योजना यांसारख्या व्यापाऱ्यांसाठी महत्त्वपूर्ण असलेल्या योजनांची सविस्तर माहिती देण्यात आली आहे. भारताला पाच ट्रिलियन डॉलर अर्थव्यवस्था बनविण्याच्या मार्गात व्यापारी वर्गाची भूमिका महत्त्वाची आहे. या दृष्टीने पंतप्रधान मा. श्री. नरेंद्र मोदी आणि मुख्यमंत्री मा. श्री. देवेंद्र फडणवीस यांनी व्यापारपूरक धोरणे आणि कल्याणकारी योजना आखल्या आहेत. या योजनांची माहिती व्यापारी वर्गापर्यंत पोहोचावी, यासाठी व्यापारी मित्र, पुणे यांनी घेतलेला पुढाकार निश्चितच कौतुकास्पद आहे.
प्रकाशन सोहळ्यादरम्यान मुख्यमंत्री फडणवीस यांनी व्यापारी मित्र, पुणे यांच्या संपूर्ण टीमचे अभिनंदन करून शुभेच्छा दिल्या आहेत.
यावेळी कौस्तुभ दबडगे, आशय रानडे, प्रशांत डिकोले, रीमा कुलकर्णी, महेंद्र लोहार,अभिजित देसर्डा, राजेश खुनिया आणि दामोदर पटेल उपस्थित होते.






Comments are closed