India Morning News
पुणे: पुणे महानगरपालिकेच्या बिबेवाडी क्षेत्रीय कार्यालयाने अनधिकृत हातगाड्या आणि टेम्पोंवर कठोर कारवाई करत आज धडक मोहीम राबवली.
या कारवाईत 10 हातगाड्या आणि 2 टेम्पो जप्त करण्यात आले. बिबेवाडी परिसरातील रस्त्यांवर अनधिकृतपणे उभ्या असलेल्या हातगाड्यांमुळे स्थानिक रहिवाशांना होणारा त्रास आणि वाहतूक कोंडी यावर उपाय म्हणून ही कारवाई करण्यात आली.
स्थानिक सोसायट्यांना त्रास, नागरिकांची मागणी बिबेवाडी परिसरातील अनेक सोसायट्यांमधील रहिवाशांनी अनधिकृत हातगाड्यांमुळे होणाऱ्या अडचणींबाबत सातत्याने तक्रारी केल्या होत्या. रस्त्याच्या कडेला उभ्या असलेल्या हातगाड्यांमुळे पादचाऱ्यांना चालणे कठीण होत होते, तसेच वाहतूक कोंडी आणि अस्वच्छतेच्या समस्याही निर्माण झाल्या होत्या.
स्थानिकांनी पुणे महानगरपालिकेकडे वारंवार निवेदने देऊन कारवाईची मागणी केली होती. अतिक्रमणावर चाप बिबेवाडी क्षेत्रीय कार्यालयाने नागरिकांच्या तक्रारींची दखल घेत आज दुपारी धडक कारवाई राबवली होती.
पथकाने परिसरातील अनधिकृत हातगाड्या आणि टेम्पोंवर कारवाई करत त्यांना जप्त केले. जप्त केलेल्या हातगाड्या आणि टेम्पोंवर नियमानुसार दंडात्मक कारवाई करण्यात येणार आहे.स्थानिकांचा दिलासा, पण सातत्याची अपेक्षा या कारवाईमुळे बिबेवाडी परिसरातील रहिवाशांना मोठा दिलासा मिळाला आहे.








Comments are closed