India Morning News
पुणे: राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या (अजित पवार गट) पुणे शहरातील अंतर्गत धुसफूस अखेर चव्हाट्यावर आली आहे. पक्षाचे पुणे शहराध्यक्ष दीपक मानकर यांनी राजकीय बदनामी आणि निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर विरोधकांकडून कटकारस्थान केले जात असल्याचा गंभीर आरोप करत आपल्या पदाचा तडकाफडकी राजीनामा दिला आहे. मानकर यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडे राजीनामा सुपूर्द करताना एक पत्र लिहून आपल्या भावना व्यक्त केल्या आहेत.
बनावट कागदपत्र प्रकरणाने वाढली खळबळ
काही दिवसांपूर्वी दीपक मानकर यांच्यावर पुणे पोलिसांनी बनावट कागदपत्रे सादर करून पोलिसांची दिशाभूल केल्याप्रकरणी आर्थिक फसवणुकीचा गुन्हा दाखल केला होता. राष्ट्रवादी काँग्रेसच्या अल्पसंख्यांक विभागाचे राज्य उपाध्यक्ष शंतनू कुकडे यांच्याशी संबंधित बलात्कार प्रकरणाच्या तपासादरम्यान मानकर यांचे नाव समोर आले. पोलिस तपासात मानकर आणि त्यांच्या मुलाच्या बँक खात्यात कुकडे यांच्याशी जवळपास पावणे दोन कोटी रुपयांचे व्यवहार झाल्याचे उघड झाले. मानकर यांनी सादर केलेली कागदपत्रे बनावट असल्याचे पोलिस तपासात निष्पन्न झाल्याने त्यांच्यावर समर्थ पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला.






Comments are closed