India Morning News
पुणे: पुणे महानगरपालिकेच्या (PMC) अनावश्यक पॅचवर्कमुळे पुणेकरांमध्ये संतापाची लाट उसळली आहे. गरज नसताना केलेले रस्त्यांचे पॅचवर्क आज आम आदमी पार्टीच्या (AAP) कार्यकर्त्यांनी ‘झाडू’ हातात घेऊन काढून टाकले. या निकृष्ट कामामुळे रस्त्यांवर खडी पसरली होती, ज्यामुळे दुचाकीस्वारांचे अपघात होण्याचा धोका वाढला होता. नागरिकांच्या तीव्र तक्रारींनंतर पुणे महानगरपालिके ला हे काम काढावे लागले, पण मुख्य प्रश्न कायम आहे: हे पॅचवर्क कोणाच्या फायद्यासाठी होते?
‘आप’चे पुणे शहर मीडिया संयोजक अँड अमोल चंद्रकांत काळे यांनी यावर ताशेरे ओढले. “पावसाळी कामांचा बहाणा करून ठेकेदारांचे खिसे भरले जात आहेत का? पुणेकरांना अशा निकृष्ट कामांसाठी का त्रास सहन करावा लागतो?” असा सवाल त्यांनी उपस्थित केला. सोशल मीडियावर पुणेकरांनी याला ‘पैशांचा अपव्यय’ आणि ‘प्रशासन-ठेकेदार संगनमत’ असे संबोधले. नागरिकांनी रस्त्यांची कामे पारदर्शक आणि गरजेनुसार व्हावीत, अशी मागणी केली आहे. इंडिया मॉर्निंग या न्यूज पोर्टलने देखील प्रभावीपणे बातमी दाखवत पुणेमहानगरपालिकेला चांगलेच धारेवर धरले आहे .
“या गलिच्छ राजकारणाला स्वच्छ करण्यासाठी नागरिकांनी येणाऱ्या महानगरपालिकेमध्ये ‘झाडू’चे बटन दाबावे,” असे आवाहन काळे यांनी केले. पुणे महानगरपालिका ने तपासाचे आश्वासन दिले असले, तरी पुणेकरांचा विश्वास जिंकण्यासाठी ठोस कारवाई आवश्यक आहे. याप्रकरणी पालिकेच्या कारभारावर प्रश्नचिन्ह उपस्थित झाले असून, भविष्यात अशी कामे टाळण्यासाठी कठोर पावले उचलण्याची गरज आहे.
Comments are closed