56
India Morning News
नागपूर – कन्हान पोलीस ठाण्याच्या हद्दीत येणाऱ्या खंडाळा गावात सुरू असलेल्या अवैध कोळसा टाळावर पोलिसांनी छापा टाकत ३५ टन कोळसा, ट्रक व मोटारसायकलसह एकूण ४३ लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त केला. याप्रकरणी ८ जणांना अटक करण्यात आली आहे.
या कारवाईत फरमान फिरोज शेख (रा. येरखेडा, कामठी), राजेंद्र नेवारे, रोहित पचपोंगडे, दिलीप गोडगे, अमित गजभिये, बाबुलाल पटले (सर्व रा. गोडेगाव) यांना अटक करण्यात आली. याशिवाय ट्रकचालक दुर्गेश सिंह चौहान (रा. इंदूर, मध्यप्रदेश) आणि एका विधी संघर्षग्रस्त मुलालाही आरोपी बनवण्यात आले आहे.
फरमान शेखवर एका आठवड्यात कोळसा तस्करीप्रकरणी ही दुसरी एफआयआर आहे. पुढील तपास कन्हान पोलीस करीत आहेत.










Comments are closed