Shopping cart

  • Home
  • News
  • दसरा मेळावा टाळून राज ठाकरे ‘मातोश्री’ वर; चर्चा रंगली

दसरा मेळावा टाळून राज ठाकरे ‘मातोश्री’ वर; चर्चा रंगली

October 6, 20250 Mins Read
राज ठाकरे उद्धव ठाकरे भेट मातोश्री
74

India Morning News

Share News:
Share

मुंबई: महाराष्ट्राच्या राजकारणात पुन्हा एकदा ठाकरे बंधूंच्या भेटीने खळबळ उडाली आहे. मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी शिवसेनेचा दसरा मेळावा टाळल्यानंतर थेट *‘मातोश्री’*वर जाऊन उद्धव ठाकरे यांची भेट घेतली.

मिळालेल्या माहितीनुसार, राज ठाकरे आज दुपारी तीनच्या सुमारास मातोश्रीवर पोहोचले. त्याआधी त्यांनी संजय राऊत यांच्या नातवाच्या बारशात हजेरी लावली होती, जिथे ठाकरे बंधू पुन्हा एकत्र दिसले. बारशानंतर राज ठाकरेंनी थेट मातोश्रीवर जाऊन उद्धव ठाकरेंशी जवळपास अर्ध्या तासाची चर्चा केली.

ही भेट कौटुंबिक असल्याचं सूत्रांचं म्हणणं असलं तरी राजकीय वर्तुळात नव्या समीकरणांच्या चर्चेला वेग आला आहे. ठाकरे बंधूंच्या एकत्र येण्याच्या शक्यतेने राज्याच्या राजकारणात चैतन्य निर्माण झालं आहे.

गेल्या काही महिन्यांपासून दोघांमध्ये संवाद आणि भेटीगाठी वाढल्या आहेत — उद्धव ठाकरेंच्या वाढदिवसाला राज ठाकरेंनी मातोश्रीवर भेट दिली होती, तर गणेशोत्सवात उद्धव ठाकरेंनी राज ठाकरेंच्या कृष्णकुंजवर दर्शन घेतलं होतं.

राजकीय तज्ज्ञांच्या मते, या भेटी ठाकरे कुटुंबातील नात्यातील उब दर्शवतात आणि भविष्यातील राजकीय समीकरणांवर त्याचा मोठा प्रभाव पडू शकतो.

Share News:
Share

Comments are closed

Related Posts

Share