India Morning News
मविआच्या मुंबई मोर्चातून महायुतीला थेट आव्हान; ‘मोर्चा झांकी, निवडणूक बाकी!’
मुंबई:महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे (मनसे) प्रमुख राज ठाकरे यांनी निवडणूक प्रक्रियेत गैरप्रकार करणाऱ्या दुबार-तिबार मतदारांना थेट इशारा दिला आहे. “मतदार घरोघरी जाऊन तपासा. दुबार-तिबार मतदार सापडले तर त्यांना तिथेच फोडून काढा, बडवून पोलिसांच्या ताब्यात द्या. त्याशिवाय हे वठणीवर येणार नाहीत,” असे राज ठाकरे म्हणाले. हा इशारा निवडणुकीच्या पारदर्शकतेसाठी असल्याचे मनसेने स्पष्ट केले.
दरम्यान, महाविकास आघाडीने (मविआ) आज मुंबईत ऐतिहासिक मोर्चा काढला. ‘मोर्चा फक्त झांकी, निवडणूक अजून बाकी!’ अशी घोषणा देत हजारो कार्यकर्ते आझाद मैदान ते मंत्रालय असा रस्त्यावर उतरले. महायुती सरकारविरोधात तीव्र संतापाचा हा स्फोट ठरला.
शरद पवार, उद्धव ठाकरे, जयंत पाटील, सुप्रिया सुळे, यांच्या उपस्थितीत ‘महायुती हटाव, महाराष्ट्र वाचवा’च्या घोषणा दिल्या. महागाई, बेरोजगारी, शेतकरी आत्महत्या, मराठा-ओबीसी आरक्षण गोंधळ, कायद्याची ढासळती अवस्था असे मुद्दे उपस्थित करत मविआने महायुतीला थेट आव्हान दिले. उद्धव ठाकरे म्हणाले, “जनता जागी झाली आहे. मतपेटीतून उत्तर मिळेल.” शरद पवार यांनी सरकारला गप्प असल्याचा आरोप केला.
मोर्चात महिलांचा मोठा सहभाग होता. कार्यकर्त्यांचा उत्साह अफाट असल्याने पोलिसांना रस्ते नियंत्रित करणे अवघड गेले. मविआने ‘जनजागरण अभियान’ जाहीर केले आहे.









