India Morning News
मुंबई: -राज्याच्या पहिल्या महिला मुख्य सचिव सुजाता सौनिक आज (30 जून) सेवानिवृत्त होत असल्याने मंत्रालय प्रशासनाला नव्या मुख्य सचिवांच्या नियुक्तीचे वेध लागले होते. अखेर, महसूल विभागाचे अतिरिक्त मुख्य सचिव राजेशकुमार मीना यांची राज्याचे नवे मुख्य सचिव म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. ते आजच आपला पदभार स्वीकारणार आहेत.
राज्याच्या पहिल्या महिला मुख्य सचिव म्हणून इतिहास रचणाऱ्या सुजाता सौनिक यांनी आपल्या कार्यकाळात प्रशासनात महत्त्वपूर्ण योगदान दिले. त्यांच्या निवृत्तीनंतर मुख्य सचिवपदासाठी ज्येष्ठतेनुसार राजेशकुमार मीना यांच्या नावाची चर्चा होती. शासनाने अखेर त्यांच्या नावावर शिक्कामोर्तब केले.
मुख्य सचिवपदासाठी राजेशकुमार मीना यांच्यासह गृह विभागाचे अप्पर मुख्य सचिव इकबालसिंह चहल आणि मुंबई महापालिकेचे आयुक्त भूषण गगराणी यांच्याही नावांची चर्चा होती. मात्र, 1988 च्या तुकडीचे सनदी अधिकारी असलेले मीना हे ज्येष्ठतेनुसार पात्र ठरले. त्यांच्या नावाला सरकारने प्राधान्य दिले. मीना हे ऑगस्ट किंवा सप्टेंबर 2025 मध्ये सेवानिवृत्त होणार आहेत










Comments are closed