Shopping cart

  • Home
  • News
  • सार्वजनिक वाचनालयात राजमाता अहिल्यादेवी होळकर जयंती कार्यक्रम साजरा

सार्वजनिक वाचनालयात राजमाता अहिल्यादेवी होळकर जयंती कार्यक्रम साजरा

June 2, 20251 Mins Read
71

India Morning News

Share News:
Share

कन्हान : – कन्हान शहरातील हनुमान नगर येथील सार्वजनिक वाचनालयात पुण्यश्लोक राजमाता अहिल्यादेवी होळकर यांचा त्रिशताब्दी जयंतीचा कार्यक्रम थाटात साजरा करण्यात आला.

कार्यक्रमाचे अध्यक्ष देवराव कावळे , प्रमुख अतिथी गंगाधरराव अवचट , सौ.अलकाताई कोल्हे यांच्या हस्ते पुण्यश्लोक राजमाता अहिल्यादेवी होळकर यांचा प्रतिमेला पुष्प हार माल्यार्पण करुन कार्यक्रमाची सुरूवात करण्यात आली . मान्यवरांनी , राहुल पारधी व कु.हर्षा बुटे यांनी पुण्यश्लोक राजमाता अहिल्यादेवी होळकर यांच्या जीवनाविषयी , कार्याविषयी उपस्थितांना मार्गदर्शन केले . कार्यक्रमाच्या प्रास्ताविके मध्ये दिनकरराव मस्के यांनी पुण्यश्लोक राजमाता अहिल्यादेवी होळकर यांचा जीवनचरित्र्या वर मार्गदर्शन केले . कार्यक्रमात उपस्थित सभासद व वाचकांनी राजमाता अहिल्यादेवी होळकर यांचा प्रतिमेला पुष्प अर्पण करून अभिवादन केले . कार्यक्रमाचे सुत्र संचालन श्याम बारई ग्रंथपाल यांनी केले आणि आभार प्रदर्शन कृणाल कोल्हे लिपिक यांनी केले.

या प्रसंगी मनोहर कोल्हे , रमण चव्हाण , रजत पाटील , कु.मंजू वानखेडे , सौ.सविता पाल , कु.आकांक्षा बरीये , अंकित देशमुख , स्वप्निल भिलावे , सुमित घोरपडे , शुभम कावळे , आकाश गुप्ता , सुरेंद्र नेवारे , रवी राणे , पियुष दिगपती , इत्यादी सभासद व वाचकांची उपस्थिती होती .

कन्हान प्रतिनिधि – ऋषभ बावनकर

Share News:
Share

Comments are closed

Related Posts

Share