Shopping cart

  • Home
  • News
  • ..तर रेशनकार्ड रद्द होणार,अपात्र लाभार्थ्यांवर सरकारची करडी नजर !

..तर रेशनकार्ड रद्द होणार,अपात्र लाभार्थ्यांवर सरकारची करडी नजर !

April 13, 20251 Mins Read
273

India Morning News

Share News:
Share

भंडारा (प्रतिनिधी): जिल्ह्यातील शासकीय स्वस्त धान्य योजनेचा गैरवापर रोखण्यासाठी आता पुरवठा विभागाने कंबर कसली आहे. अपात्र लाभार्थ्यांची ओळख पटवून त्यांच्या रेशनकार्डवर कारवाई करण्यात येणार असून, लवकरच मोठ्या प्रमाणात पडताळणी मोहीम राबविण्यात येणार आहे.

या प्रक्रियेमध्ये लाभ घेणाऱ्या नागरिकांनी आपले वार्षिक उत्पन्न प्रमाणपत्र व रहिवासी पुरावा तयार ठेवणे अत्यंत आवश्यक आहे. ही कागदपत्रे सादर करण्यात अयशस्वी झाल्यास संबंधितांचे रेशनकार्ड रद्द होण्याची शक्यता आहे.

२.५२ लाख रेशनकार्डधारकांची तपासणी-

२ लाख ५२ हजार १२२ रेशनकार्डधारकांच्या माहितीची तपासणी केली जाणार असून, प्राधान्य, अंत्योदय, एपीएल व पांढऱ्या शिधापत्रिकाधारकांचा यामध्ये समावेश आहे. आतापर्यंत ८९.४६ टक्के लाभार्थ्यांनी ई-केवायसी प्रक्रिया पूर्ण केली असली तरीही १८.५४ टक्के लाभार्थींची नोंद अजूनही प्रलंबित आहे.

अपात्र, मृत किंवा चुकीची माहिती देणाऱ्यांचे रेशनकार्ड होणार रद्द-

अनेक आर्थिकदृष्ट्या सक्षम व्यक्ती शासकीय रेशनचा लाभ घेत असल्याचे निदर्शनास आले आहे. याशिवाय काही लाभार्थ्यांचा मृत्यू झाल्यानंतरही त्यांच्या नावावरून धान्य घेतले जात असल्याचीही माहिती समोर आली आहे. त्यामुळे अपात्र, मृत किंवा चुकीची माहिती देणाऱ्या लाभार्थ्यांना या मोहिमेमुळे योजनेंबाहेर टाकण्यात येणार आहे.

लाभार्थ्यांनी भरावयाच्या फॉर्ममध्ये दोन विभाग असतील –
‘अ’ व ‘ब’. हा फॉर्म स्वस्त धान्य दुकानांमध्ये जमा करावा लागेल. त्यानंतर पुरवठा विभाग संबंधित माहितीची खातरजमा करणार आहे. चुकीची, अपुरी अथवा दिशाभूल करणारी माहिती आढळल्यास संबंधितांचे रेशनकार्ड रद्द करण्यात येईल.

लाभार्थ्यांसाठी ही कागदपत्रे अनिवार्य:
उत्पन्नाचा दाखला: चालू आर्थिक वर्षासाठी अधिकृत दाखला अनिवार्य.
रहिवासी प्रमाणपत्र: लाभार्थी संबंधित पत्त्यावर वास्तव्यास असल्याचे पुराव्यासह प्रमाणपत्र

Share News:
Share

Comments are closed

Related Posts

Share