Shopping cart

  • Home
  • Sports
  • आरसीबीचा RCB दमदार विजय: रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूने जिंकले आयपीएल 2025 चे जेतेपद!

आरसीबीचा RCB दमदार विजय: रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूने जिंकले आयपीएल 2025 चे जेतेपद!

June 3, 20251 Mins Read
566

India Morning News

Share News:
Share

अहमदाबाद: रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू (RCB) ने अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियमवर रंगलेल्या थरारक अंतिम सामन्यात पंजाब किंग्स इलेव्हनवर मात करत आयपीएल 2025 चे जेतेपद आपल्या नावावर केले. 18 व्या हंगामात RCB ने चमकदार कामगिरी करत प्रथमच हा मान मिळवला आहे.

RCB ने प्रथम फलंदाजी करत 20 षटकांत 190 धावांचे आव्हानात्मक लक्ष्य पंजाब किंग्ससमोर ठेवले. RCB च्या फलंदाजांनी आक्रमक खेळी करत पंजाबच्या गोलंदाजांना चांगलेच हैराण केले.पंजाब किंग्स इलेव्हनची फलंदाजी अडखळली आणि त्यांना निर्धारित 20 षटकांत लक्ष्य गाठता आले नाही. RCB च्या गोलंदाजांनी शानदार प्रदर्शन करत सामन्यावर पूर्णपणे वर्चस्व ठेवलं होतं

सामना संपताच नरेंद्र मोदी स्टेडियमवर RCB च्या चाहत्यांमध्ये उत्साह संचारला. खेळाडूंनी मैदानावर विजयोत्सव साजरा करत आहेत. तर स्टेडियम रंगीबेरंगी आतषबाजी आणि जल्लोषाने दणाणले आहे.

यंदाच्या हंगामात RCB ने सातत्यपूर्ण खेळाचे प्रदर्शन केले. साखळी फेरीपासूनच त्यांनी विराट कोहली बरोबरच यांच्या संघातील सदस्यांनी आक्रमक फलंदाजी, अचूक गोलंदाजी आणि उत्कृष्ट क्षेत्ररक्षणाने सर्वांना प्रभावित केले आहे.

Share News:
Share

Comments are closed

Related Posts

Share