Shopping cart

  • Home
  • News
  • सार्वजनिक ठिकाणी अस्वच्छता पसरविणाऱ्या 69 प्रकरणांची नोंद उपद्रव शोध पथकाची धडक कारवाई

सार्वजनिक ठिकाणी अस्वच्छता पसरविणाऱ्या 69 प्रकरणांची नोंद उपद्रव शोध पथकाची धडक कारवाई

April 8, 20251 Mins Read
55

India Morning News

Share News:
Share

नागपूर, ता. 08: नागपूर महानगरपालिकेच्या उपद्रव शोध पथकाने सार्वजनिक ठिकाणी लघुशंका करणाऱ्यांवर, कचरा फेकणाऱ्यांवर, थुंकणाऱ्यांवर, 79 मायक्रॉन पेक्षा कमी प्लास्टिक पिशवीचा वापर करणाऱ्यांवर अधिक कठोर कारवाई ची सुरुवात केली आहे. मंगळवार (08) रोजी शोध पथकाने 58 प्रकरणांची नोंद करून रु. 44,300/- रुपयाचा दंड वसूल केला. हाथगाडया, स्टॉल्स, ‍पानठेले, फेरीवाले, छोटे भाजी विक्रेते यांनी लगतच्या परिसरात अस्वच्छता (रु.400/- दंड) या अंतर्गत 31 प्रकरणांची नोंद करून रु.12,400/- रुपयांची वसुली करण्यात आली. व्यक्तीने रस्ता, फुटपाथ, मोकळी जागा अशा ठिकाणी कचरा टाकणे (रु. 100/- दंड) या अंतर्गत 01 प्रकरणांची नोंद करून रु. 100/- रुपयांची वसुली ‍करण्यात आली. दुकानदाराने रस्ता, फुटपाथ, मोकळी जागा अशा ठिकाणी कचरा टाकणे (रु. 400/- दंड) या अंतर्गत 11 प्रकरणांची नोंद करून रु.4,400/- रुपयांची वसुली करण्यात आली. मॉल, उपहारगृहे, लॉजिंग, बोर्डींग हॉटेल, सिनेमा हॉल, मंगल कार्यालय, कॅटरर्स सर्व्हीस प्रोव्हायडर इत्यादींनी रस्ता या अंतर्गत 01 प्रकरणांची नोंद करून 2,000/- रुपयांची वसुली करण्यात आली. वाहतूकीचा रस्ता मंडप, कमान, स्टेज इत्यादी रचना करुन अथवा वैयक्तिक कामाकरीता बंद करणे या अंतर्गत 07 प्रकरणांची नोंद करून रु.5,000/- रुपयांची वसुली करण्यात आली. वर्कशाप, गॅरेजेस व इतर दुरुस्तीचे व्यवसायीकांने रस्ता, फुटपाथ मोकळी जागा अशा ठिकाणी कचरा टाकणे या अंतर्गत 1 प्रकरणांची नोंद करून रू.1,000/- रुपयांची वसुली करण्यात आली. सार्वजनिक ठिकाणी रस्ता, फुटपाथ, मोकळी जागा अशा जनावरे बांधणे या अंतर्गत 03 प्रकरणांची नोंद करून रू.7,000/- रुपयांची वसुली करण्यात आली. उपरोक्त यादीत न आढळणारे इतर उपद्रव व्यक्ती असल्यास 27 प्रकरणांची नोंद करून रु.5,400/- दंड वसूल करण्यात आलेला आहे. उपरोक्त यादीत न आढळणारे इतर उपद्रव संस्था असल्यास 07 प्रकरणांची नोंद करून रु.7,000/- दंड वसूल करण्यात आलेला आहे. ही कारवाई उपद्रव शोध पथक प्रमुख वीरसेन तांबे यांच्या नेतृत्वात करण्यात आली.

तसेच उपद्रव शोध पथकाने लक्ष्मी नगर झोन अंतर्गत मे. विढोबा अपार्टमेंट यांनी बांधकामाचे साहित्य रस्त्यावर टाकल्याबद्दल एकुण रु.10,000/- चे दंड वसुल करण्यात आले. व मे. न्यू टि. व्ही. एस शोरुम यांनी रस्त्यावर सी अँड डी कचरा टाकल्याबद्दल रू. 5,000/- चे दंड वसुल करण्यात आला. धरमपेठ झोन अंतर्गत पांडत पैठणी यांनी विनापरवानगी विद्युत खांबांवर जाहिरातीचे बॅनर लावल्याप्रकरणी रु.10,000/- हजार रुपयांचा दंड वसुल केला. हनुमान नगर झोन अंतर्गत सेंट पॉल सी.बी.एस.सी स्कूल यांनी विनापरवानगी विद्युत खांबांवर जाहिरातीचे बॅनर लावल्याप्रकरणी रु.5,000/- हजार रुपयांचा दंड वसुल केला. गांधीबाग झोन अंतर्गत मे.‍ कविता स्वीट्स यांनी प्लास्टिकचा वापर केल्याबद्दल रु.5,000/- चे दंड वसुल करण्यात आला. मंगळवारी झोन अंतर्गत मे. जय माँ शेरावाली फ्रुट सेंटर व श्री. जय किसन शाहु यांनी प्लास्टिकचा वापर केल्याबद्दल एकुण रु.10,000/- चे दंड वसुल करण्यात आला. उपद्रव शोध पथकाने 07 प्रकरणांची नोंद करून रू. 45,000/- दंड वसूल केला.

Share News:
Share

Comments are closed

Related Posts

Share