Shopping cart

  • Home
  • News
  • दाभा परिसरात अपुरा, दुषीत पाणीपुरवठ्याच्या समस्येपासून दिलासा…

दाभा परिसरात अपुरा, दुषीत पाणीपुरवठ्याच्या समस्येपासून दिलासा…

June 2, 20251 Mins Read
180

India Morning News

Share News:
Share

ओसीडब्ल्यूच्या कार्यवाहीमुळे हजारो घरांमध्ये पाणीपुरवठा सुरळीत

नागपूर, 2 जून 2025, नागपूर शहरातील दाभा परिसरात अनेक भागात अपुरा तसेच दुषीत पाणीपुरवठ्याच्या समस्यांवर नागपूर महानगरपालिका आणि ओसीडब्ल्यूने तातडीने उपाययोजना करुन नागरिकांना दिलासा मिळवून दिला आहे. अपुरा पाणी पुरवठा होत असलेल्या भागातील नळजोडणी दाभा-2 अमृत जलकुंभाला जोडून व दुषीत पाणी पुरवठा होत असलेल्या भागामध्ये नवीन जलवाहिनी टाकून परिसरातील हजारो घरांमध्ये पाणीपुरवठा सुरळीत करण्यात आलेला आहे.

दाभा परिसरातील ऑरेंज मेट्रो सिटी, गुरुदत्त सोसायटी, गणेश नगर, मडावी लेआउट, न्यू शांती नगर, शिवहारे लेआउट या भागांमध्ये मागील काही दिवसांपासून कमी दाब आणि अपुऱ्या पाणीपुरवठ्याची समस्या जाणवत होती त्यामुळे या भागात टँकरने पाणीपुरवठा करावा लागत होता. मात्र, नागपूर महानगरपालिका व ओसीडब्ल्यू ने या समस्येवर तातडीने उपाययोजना करण्यासाठी काम हाती घेतले. ऑरेंज मेट्रो सिटी ते शिवहारे लेआउट हा सर्व रहिवासी भाग नवीन दाभा-2 अमृत जलकुंभाशी जोडण्यात आला त्यामुळे या भागात पाणीपुरवठ्यात सुधारणा झाली आहे.

याशिवाय दाभा-1 अमृत जलकुंभ परिसरातील जगदीश नगर समाजभवन परिसरामध्ये दूषित पाणीपुरवठ्यासंदर्भात नागरिकांकडून अनेक तक्रारी मनपाकडे प्राप्त झाल्या होत्या. या तक्रारींच्या अनुषंगाने ओसीडब्ल्यू द्वारे समस्येचे मूळ शोधण्यासाठी जलवाहिनीमध्ये कॅमेऱ्याद्वारे (RoboCam) पाहणी करण्यात आली. या पाहणी अंतर्गत निदर्शनात आल्यानुसार अज्ञात आणि जुन्या जोडण्या तोडण्यात आल्या व जलवाहिनीची स्वच्छता (फ्लशिंग) देखील करण्यात आली. मात्र यानंतरही दूषित पाणीपुरवठ्याची समस्या कायम असल्यामुळे नागरिकांच्या आरोग्याचा विचार करता ओसीडब्ल्यू द्वारे तातडीने जलवाहिनी बदलण्याचा प्रस्ताव (R&R फाईल) तयार करण्यात आला. मनपाद्वारे प्रस्ताव तात्काळ मंजूर करण्यात आला. प्रस्ताव मंजूर होताच तातडीने नवीन जलवाहिनी टाकण्यात आली. नवीन जलवाहिनी कार्यान्वित झाल्यानंतर जुनी जलवाहिनी बंद करण्यात आली. यामुळे परिसरातील नागरिकांना योग्य दाबाने शुद्ध पाणीपुरवठा मिळू लागला आहे. तसेच, जुन्या जलवाहिनीवरील सर्व अनधिकृत जोडण्या तोडण्यात आलेल्या आहेत. नवीन जलवाहिनी कार्यान्वित झाल्यामुळे परिसरातील सर्व नागरिक समाधानी आहेत.

मनपा व ओसीडब्ल्यू च्या या तत्पर कार्यवाहीमुळे शहरातील या भागांतील पाणीपुरवठ्याची समस्या मार्गी लागली आहे, ज्यामुळे नागरिकांना मोठा दिलासा मिळाला आहे.

पाणीपुरवठ्याबाबत अधिक माहितीसाठी, ग्राहक NMC-OCW हेल्पलाइन क्रमांक 1800 266 9899 वर संपर्क साधू शकतात किंवा contact@ocwindia.com वर ईमेल करू शकतात.

Share News:
Share

Comments are closed

Related Posts

Share