India Morning News
नागपूर :-
नागपूर शहरातील विविध विकासकामे, पूरग्रस्त भागांच्या दुरुस्तीची कामे आणि पावसाळ्यातील आपत्ती व्यवस्थापनाच्या अनुषंगाने आज जिल्हाधिकारी कार्यालयात नागपूर महानगरपालिकेच्या अधिकाऱ्यांची महत्त्वपूर्ण आढावा बैठक पार पडली. या बैठकीत जिल्हाधिकाऱ्यांनी अधिकाऱ्यांना आवश्यक सूचना आणि निर्देश महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी निर्देश दिले.
या बैठकीला खासदार श्यामकुमार बर्वे, आमदार कृष्णा खोपडे, आमदार प्रवीण प्रतिभा प्रभाकरराव दटके, आमदार चरणसिंग ठाकूर, आमदार अभिजित वंजारी, माजी आमदार सुधाकर कोहले, नागपूर मनपाचे माजी स्थायी समिती अध्यक्ष नरेंद्र बोरकर, मनपाचे मुख्य अभियंता मनोज तालेवार तसेच सर्व झोनचे कार्यकारी अभियंता उपस्थित होते.
गेल्या काही दिवसांत नागपूर शहरात झालेल्या मुसळधार पावसामुळे अनेक भागांत पाणी साचून नुकसान झाले. या पूरग्रस्त भागांतील रस्ते, गटारे, पाणीपुरवठा आणि वीज यंत्रणेच्या दुरुस्तीवर विशेष भर देण्यात आला. जिल्हाधिकाऱ्यांनी मनपा अधिकाऱ्यांना दुरुस्तीची कामे तातडीने पूर्ण करण्याचे निर्देश दिले. तसेच, पावसाळ्यात उद्भवणाऱ्या आपत्तींना सामोरे जाण्यासाठी मनपाने आपत्कालीन व्यवस्थापन यंत्रणा सज्ज ठेवावी, असेही सूचित केले.
पावसाळ्यात शहरात पाणी साचण्याच्या समस्येवर नियंत्रण मिळवण्यासाठी नालेसफाई, पाण्याचा निचरा आणि पूरस्थिती हाताळण्यासाठी मनपाला कृती आराखडा तयार करण्यास सांगण्यात आले. तसेच, नागरिकांच्या सुरक्षेसाठी आणि मूलभूत सुविधा अबाधित ठेवण्यासाठी सर्व झोनच्या कार्यकारी अभियंत्यांना समन्वयाने काम करण्याचे निर्देश देण्यात आले.








Comments are closed