Shopping cart

  • Home
  • News
  • सदानंद दाते महाराष्ट्राचे नवे DGP; 26/11 हल्यात पराक्रमी भूमिका

सदानंद दाते महाराष्ट्राचे नवे DGP; 26/11 हल्यात पराक्रमी भूमिका

December 3, 20251 Mins Read
IPS officer Sadanand Date appointed new Maharashtra DGP
108

India Morning News

Share News:
Share

मुंबई : दीर्घ अनुभव आणि कठोर प्रशासनशैलीसाठी ओळखले जाणारे वरिष्ठ IPS अधिकारी सदानंद दाते यांची महाराष्ट्राच्या पोलीस महासंचालक (DGP) पदावर नियुक्ती निश्चित झाली आहे. विद्यमान DGP रश्मी शुक्ला 31 डिसेंबर 2025 रोजी निवृत्त होणार असल्याने राज्य सरकारने पुढील नेतृत्व म्हणून दाते यांची निवड केली आहे. गृह विभागाने केंद्राकडे पाठवलेल्या अधिकाऱ्यांच्या यादीत दाते यांचे नाव सुरुवातीपासूनच अग्रस्थानी होते.

तीन दशकांचा अनुभव, अनेक महत्त्वाच्या पदांवर काम

1990 बॅचचे अधिकारी दाते यांनी आपल्या सेवाकाळात आर्थिक गुन्हे तपास विभाग, सायबर क्राईम विंग, रेल्वे पोलीस तसेच नवी मुंबई पोलिस अधीक्षक अशा अनेक पदांवर उल्लेखनीय कामगिरी केली आहे. सध्या ते राष्ट्रीय तपास यंत्रणेचे (NIA) महासंचालक म्हणून कार्यरत असून ‘ब्लॅक कॅट’ कमांडोंच्या अनेक ऑपरेशन्समध्ये त्यांनी नेतृत्व दाखवले आहे.

कामा रुग्णालयातील संघर्ष अद्याप स्मरणात

26/11 मुंबई दहशतवादी हल्ल्यावेळी दाते यांनी दाखवलेले धाडस आजही लोकांच्या लक्षात आहे. तेव्हा ते मुंबई क्राईम ब्रांचमध्ये तैनात होते. दोन दहशतवादी कामा रुग्णालयात घुसल्याची माहिती मिळताच दाते स्वतः पथक घेऊन घटनास्थळी पोहोचले. प्रसंगाचा सामना करत त्यांनी अनेकांना सुरक्षित बाहेर काढले. या चकमकीत त्यांना गोळ्या लागल्या तरी त्यांनी माघार घेतली नाही.

राज्य पोलिस दलात शिस्त, व्यावसायिकता आणि कठोर अंमलबजावणी यांचे नवे पर्व त्यांच्या नेतृत्वाखाली दिसेल, अशी अपेक्षा व्यक्त होत आहे.

Share News:
Share

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Related Posts

Share