India Morning News
मुंबई : बॉलिवूडमध्ये पुन्हा एकदा खळबळ उडाली आहे. ड्रग्ज प्रकरणात शाहरुख खानचा मुलगा आर्यन खान अटक झाल्यानंतर समीर वानखेडे आणि शाहरुख यांच्यात वादाची चर्चा झाली होती. आता आयआरएस अधिकारी समीर वानखेडे यांनी ‘बॅड्स ऑफ बॉलिवूड’ या ओटीटी शोविरुद्ध दिल्ली उच्च न्यायालयात याचिका दाखल केली आहे. यामध्ये शाहरुख आणि गौरी खान यांच्यांच्या रेड चिलीज एंटरटेनमेंट प्रायव्हेट लिमिटेड आणि नेटफ्लिक्स कंपनीला अब्रुनुकसानीचा दावा करण्यात आला आहे.
काय आहे प्रकरण?
यानुसार, बॅड्स ऑफ बॉलिवूड या मालिकेत समीर वानखेडे यांची बदनामी केली गेल्याचा आरोप आहे. या मालिकेमुळे अंमली पदार्थ विरोधी कायद्याची अंमलबजावणी करणाऱ्या संस्थांची प्रतिमा धूसर झाली असून लोकांचा विश्वास कमी झाला आहे. याचिकेत असेही म्हटले आहे की मालिकेची निर्मिती वानखेडे यांची छवि हानी पोहचवण्यासाठी केली गेली.
मुंबई हायकोर्टात आणि एनडीपीएस विशेष न्यायालयात समीर वानखेडे आणि आर्यन खान यांच्याशी संबंधित प्रकरणे प्रलंबित असतानाही हा शो ओटीटीवर प्रदर्शित केला गेला, असा आरोप याचिकेत करण्यात आला आहे.
शोच्या एका सीनमध्ये राष्ट्रीय प्रतीक ‘सत्यमेव जयते’ संदर्भात अश्लील आणि अपमानजनक हावभाव दाखवण्यात आले आहेत. त्यामुळे Prevention of Insults to National Honour Act, 1971 चे उल्लंघन झाल्याचा आरोप आहे, तसेच या सीनवर दंडात्मक कारवाई होऊ शकते.
याचिकेत असेही म्हटले आहे की, बॅड्स ऑफ बॉलिवूडच्या कंटेंटमध्ये अश्लीलता आणि आक्षेपार्ह प्रसंगांचा समावेश आहे, ज्यामुळे देशातील नागरिकांच्या भावनांना दुखावण्याचा प्रयत्न केला गेला आहे. समीर वानखेडे यांनी या मालिकेमुळे झालेल्या नुकसानासाठी 2 कोटी रुपयांची भरपाईची मागणी केली आहे. ही रक्कम टाटा मेमोरियल कॅन्सर हॉस्पिटलमध्ये कर्करोगाच्या रुग्णांसाठी दान केली जाईल, असे याचिकेत नमूद करण्यात आले आहे.









Comments are closed