Shopping cart

  • Home
  • News
  • संघगीत लोकार्पण सोहळा: राष्ट्रभक्तीचा शाश्वत स्वर नागपूरात गुंजला

संघगीत लोकार्पण सोहळा: राष्ट्रभक्तीचा शाश्वत स्वर नागपूरात गुंजला

September 29, 20251 Mins Read
नागपूरात संघगीत लोकार्पण सोहळा
150

India Morning News

Share News:
Share

नागपूर: राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या शतकपूर्तीनिमित्त खासदार सांस्कृतिक महोत्सव समितीच्या वतीने कविवर्य सुरेश भट सभागृह, नागपूर येथे आयोजित संघगीत लोकार्पण सोहळा थाटात संपन्न झाला.

या सोहळ्याला रा.स्व.संघाचे प.पू. सरसंघचालक डॉ. मोहन भागवत, केंद्रीय रस्ते वाहतूक व महामार्ग मंत्री नितीन गडकरी, राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते.

नागपूरात संघगीत लोकार्पण सोहळा
नागपूरात संघगीत लोकार्पण सोहळा – मोहन भागवत, चंद्रशेखर बावनकुळे, नितीन गडकरी, देवेंद्र फडणवीस उपस्थित

संघगीत म्हणजे राष्ट्रभक्तीचा शाश्वत स्वर असून, ते प्रत्येक पिढीला प्रेरणा देत राहील. हे गीत केवळ शब्दांचा संग्रह नसून, राष्ट्रभक्तीचा दीप पेटवणारे मंत्र आहे. सुप्रसिद्ध गायक शंकर महादेवन यांनी नव्या संगीतबद्धतेने या गीतांना अधिक प्रभावी रूप दिले. त्यांच्या स्वरांनी कार्यक्रमाला ऊर्जामय वातावरण प्राप्त झाले. या गीतांमधून स्वयंसेवकांच्या हृदयात चेतना निर्माण होऊन राष्ट्रसेवेचा संकल्प दृढ होईल, असे डॉ. मोहनजी भागवत यांनी सांगितले.

केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी संघाच्या शतकपूर्तीचे औचित्य साधून या गीतांच्या लोकार्पणाचे महत्त्व अधोरेखित केले, तर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी संघाच्या कार्याची समाजासाठी उपयुक्तता विशद केली.

यावेळी महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे, खासदार सांस्कृतिक समितीचे अध्यक्ष माजी आ. अनिल सोले, माजी आ. अशोक मानकर, भाजप प्रदेश कार्यकारिणी सदस्य जयप्रकाश गुप्ता, राजेश बागडी, संघाचे पदाधिकारी, स्वयंसेवक आणि नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

हा सोहळा केवळ गीतलोकार्पणापुरता मर्यादित नसून, संघाच्या शतकभराच्या सेवाकार्याचा आणि राष्ट्रभक्तीच्या मूल्यांचा उत्सव होता. यानिमित्ताने नागपूरातून देशभरात राष्ट्रप्रेमाचा संदेश पसरला.

Share News:
Share

Comments are closed

Related Posts

Share