Shopping cart

  • Home
  • News
  • संजय गांधी, श्रावण बाळ निराधार योजनेचे उर्वरीत अनुदान देण्याची मागणी

संजय गांधी, श्रावण बाळ निराधार योजनेचे उर्वरीत अनुदान देण्याची मागणी

June 28, 20251 Mins Read
244

India Morning News

Share News:
Share

माजी गटनेते राजेंद्र शेंदरे यांच्या नेतृत्वात तहसीलदार सुभाष वाघचौरे यांना निवेदन

कन्हान : – पारशिवनी तालुक्यातील संजय गांधी , श्रावण बाळ निराधार योजनेचे अनेक लाभार्थी मागील सहा महिन्यापासुन वंचित असल्याने त्यांचे उर्वरित अनुदान त्यांच्या बँक खात्यात पाठवुन हे अनुदान नियमित देण्याची मागणी स्थानिक नागरिकांनी कन्हान – पिपरी नगर परिषद माजी गटनेते राजेंद्र शेंदरे यांच्या नेतृत्वात पारशिवनी तहसिलदार सुभाष वाघचौर याना निवेदन देऊन केली आहे.

निवेदन पत्रात सांगितले आहे कि संजय गांधी , श्रावण बाळ निराधार योजनेच्या लाभार्थ्यांना अनेक दिवसापासुन अनुदान देण्यात आले नाही . त्यामुळे निराधारांच्या अडचणित दिवसेदिवस वाढ होत आहे . शासना कडुन अनुदान देण्यात येते . परंतु गेल्या सहा महिन्यापासुन पारशिवनी तालुक्यातील संजय गांधी , श्रावण बाळ निराधार योजनेच्या अनेक लाभार्थी नागरिक या योजने पासुन वंचित आहेत . विधवा , अपंग , वयोवृद्ध , निराधार व्यक्तींना बँक खात्यात १५०० रुपए देवुन त्यांना मदतीचे शासनाचे धोरण योग्य आहे . परंतु तहसील कार्यालयात निराधार व्यक्तींना आधारकार्ड आणि बँक पासबुक , मोबाईल ओटीपी सांगा असे सांगुन वारंवार पारशिवनी तहसिलच्या चकरा मारून सुद्धा निराधार व्यक्तींच्या बँक खात्यात अनुदान जमा होत नसल्याचे जानवत आहे . तसेच आधार केंद्र काही दिवसापासुन बंद असल्यामुळे हया निराधार लाकांचे आधार कार्ड अपडेट होत नसल्याने ते सर्व या योजने पासुन वंचित आहेत . बहुतांश सर्व निराधार व्यक्तींनी आधारकार्ड आणि बँक पासबुक मोबाईल ओटीपी देवुन पारशिवनी तहसील कार्यालयाची प्रक्रिया पुर्ण केलेली आहे . तरी सुद्धा त्यांच्या खात्यात अजुनही सात महिने किंवा आठ महिने झालेले आहे तरी सुद्धा त्यांच्या खात्यात एका महिण्याचे पैशे आलेले आहे व सहा किंवा सात महिण्याचे पैसे त्यांच्या खात्यात अजुनही आलेले नाही . निराधार योजनेचे उर्वरीत अनुदान ज्या व्यक्तींच्या खातात अनुदान रक्कम आलेले नाहीत त्या निराधार गरजु व्यक्तींना लवकरात लवकर पाठवुन लाभ देण्यात यावे , अशी मागणी नागरिकांनी माजी गटनेते राजेंद्र शेंदरे यांच्या नेतृत्वात तहसीलदार सुभाष वाघचौरे यांना निवेदन देऊन केली आहे .

या प्रसंगी डॉ. राजेश ठाकरे , अतुल हजारे , राहुल मेंगर , शैलेश शेळके , प्रकाश वांढे , अशोक कुथे , आशिष दिवटे , माजी नगरसेविका संगिता खोब्रागडे , अनिता पाटिल , वंदना कुरडकर , सुनंदा दिवटे , सागर सायरे , मनोज कुरडकर , निलकंठ मस्के , डॉ. प्रमोद भड , नंदलाल बावनकुळे , संजय रंगारी , चिंटु वाकुडकर , आंनद शर्मा , दिपंकर गजभिये , प्रकाश कांबळे , दिवाकर भोयर , सतीश वाड़ीभस्मे , नितेश वासनिक सह आदि नागरिक उपस्थित होते .

Share News:
Share

Comments are closed

Related Posts

Share