Shopping cart

  • Home
  • News
  • विकसित कृषी संकल्प अभियान अंतर्गत खंडाळा घाटाटे येथे शास्त्रज्ञांनी दिली भेट

विकसित कृषी संकल्प अभियान अंतर्गत खंडाळा घाटाटे येथे शास्त्रज्ञांनी दिली भेट

June 5, 20251 Mins Read
253

India Morning News

Share News:
Share

कन्हान : –

पारशिवनी तालुक्यातील खंडाळा घटाटे ग्रामपंचायत कार्यालयात केंद्र शासनाच्या विकसित कृषी संकल्पज्ञ अंतर्गत तालुका कृषी अधिकारी पारशिवनी राकेश वसु यांच्या मार्गदर्शनात सहाय्यक कृषी अधिकारी विवेकानंद शिंदे यांनी मौजा खंडाळा घटाटे येथे कार्यक्रमाचे आयोजन केले, यावेळी कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थान चेतन कुंभलकर ,(उपसरपंच ) खंडाळा घटाटे यांनी भूषवले , प्रमुख पाहुणे म्हणून वेंकट कारेमोरे (जिल्हा परिषद सदस्य) साटक तथा रवींद्र केने उपस्थित होते . तसेच खंडाळा घटाटे येथील शेती विषयी राज्य पुरस्कार प्राप्त शेतकरी व शेतकरी नेते संजय सत्यकार हे देखील मार्गदर्शनासाठी प्रगतशील शेतकरी म्हणून लाभले, “भारत कृषी जागरण कृषी संशोधन शेतकऱ्यांचे दारी” या संकल्पनेवर आधारित विकसित कृषी संकल्प अभियान कार्यक्रम कृषी विज्ञान केंद्र माफसु नागपूर आणि कृषी विभाग यांच्या संयुक्त विद्यमाने शास्त्रज्ञ डॉ.खोब्रागडे आर आय (प्राध्यापक कृषी महाविद्यालय नागपूर) यांनी भाजीपाला फळबाग व शेती पूरक व्यवसाय याबाबत मार्गदर्शन केले .

सौ.डॉक्टर श्वेता लेंडे (विषय विशेषज्ञ कृषी विज्ञान केंद्र माफसु) यांनी पशुसंवर्धनाविषयी आणि पशुधन वाढी विषयी शेतकरी बांधवांना मार्गदर्शन केले .यावेळी डॉ. शानमुधम (वरिष्ठ वैज्ञानिक केंद्र शासन) यांनी कापूस पिकाबाबत बांधवांना मार्गदर्शन केले व उत्पादन वाढीसाठी चर्चा केली . यावेळी शेतकरी नेते संजय सत्यकार यांनी शेतकऱ्यांना खरीप हंगामामध्ये येणाऱ्या अडचणी विषयी माहिती दिली आणि कापूस घनपद्धतीने लागवडी बाबत चर्चा केली व उप कृषी अधिकारी एस पी कुबडे यांनी कृषी विभागाच्या विविध योजनेबाबत माहिती दिली .

कार्यक्रमास माजी सरपंच हेमंत नागपुरे यांनी ॲग्री स्टॅक योजनेविषयी माहिती दिली व शेतकरी बांधवांना फार्मर आयडी काढून घेण्याबाबत आवाहन केले .धनराज चकोले , रामचंद्र चकोले , राकेश पोटभरे , श्रीशश दिलीप हटवार , शंकर हटवार , महादेव गावंडे , संदीप ऊके , ज्ञानेश्वर भोयर , कलावती शेंडे , लताबाई ठाकरे यांच्या सह कांद्री , सिहोरा , गहूहिवरा , निलज , बोरि शिंगोरी , सिंगारदीप येथील सुद्धा बहुसंख्य शेतकरी बांधव उपस्थित होते . कार्यक्रम यशस्वी करण्याकरिता प्रफुलजी नागपुरे , कृषी मित्र व धनीराम उके यांनी विशेष सहकार्य केले . उपसरपंच चेतन कुंभलकर यांच्या अध्यक्षीय भाषणाने कार्यक्रमाची सांगता झाली . आभार प्रदर्शन ग्रामपंचायत अधिकारी विनायक गहाणे यांनी केले .

कन्हान प्रतिनिधि – ऋषभ बावनकर

Share News:
Share

Comments are closed

Related Posts

Share