Shopping cart

  • Home
  • News
  • सरन्यायाधीश गवई यांच्या स्वागताला वरिष्ठ अधिकारी गैरहजर; प्रोटोकॉलच्या दुर्लक्षावर व्यक्त केली नाराजी

सरन्यायाधीश गवई यांच्या स्वागताला वरिष्ठ अधिकारी गैरहजर; प्रोटोकॉलच्या दुर्लक्षावर व्यक्त केली नाराजी

May 19, 20251 Mins Read
100

India Morning News

Share News:
Share

मुंबई – सरन्यायाधीश भूषण गवई यांनी आपल्या मुंबईतील पहिल्या दौऱ्यात झालेल्या एका कार्यक्रमात प्रोटोकॉलच्या उल्लंघनावर नाराजी व्यक्त केली आहे. बार कौन्सिल ऑफ महाराष्ट्र अ‍ॅण्ड गोवा यांनी आयोजित केलेल्या सत्कार समारंभात राज्याचे मुख्य सचिव, पोलिस महासंचालक आणि मुंबई पोलिस आयुक्त उपस्थित नव्हते, याकडे गवई यांनी लक्ष वेधले.

गवई यांनी नमूद केले की, “मी प्रोटोकॉलबाबत फार आग्रही नाही, पण माझ्या जागी कोणी दुसरा असता, तर कदाचित घटनेतील अनुच्छेद १४२ चा वापर केला गेला असता.” त्यांनी स्पष्ट केले की त्यांनी ही बाब केवळ जनतेच्या माहितीकरता सांगितली आहे.

त्यांच्या या प्रतिक्रियेनंतर संबंधित तिन्ही वरिष्ठ अधिकाऱ्यांनी दिलगिरी व्यक्त केली. गवई यांनी यावर पुढे सांगितले की, “माझ्याकडे कोणतीही वैयक्तिक तक्रार नाही. जे घडलं ते मी केवळ नमूद केलं आहे.”

सर्वोच्च न्यायालयाचा अनुच्छेद १४२ न्यायालयाला विशेष अधिकार देतो आणि अशा परिस्थितीत त्या अधिकारांची आठवण करून देणं अनेक अर्थांनी महत्त्वाचं मानलं जात आहे.

Share News:
Share

Comments are closed

Related Posts

Share