India Morning News
नागपूर: शांतीवन चिंचोली (नागपूर) येथे मातोश्री गोपीकाबाई बाजीराव ठाकरे यांनी दान दिलेल्या जागेवर दिवंगत धम्मसेनापती वामनराव गोडबोले यांनी बौद्धविहार, शांतीकुटी आणि महामानव डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांचे म्युझियम उभारले आहे. या ठिकाणी आमदार रोहित पवार भेट देऊन म्युझियममधील डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी वापरलेल्या ऐतिहासिक वस्तूंची पाहणी करण्याचा अविस्मरणीय अनुभव मिळाला.
या म्युझियममध्ये भारतीय राज्यघटनेच्या निर्मितीमध्ये वापरलेले टाईपरायटर, बाबासाहेबांचे गॉगल, खुर्ची यासह तब्बल १,०८० ऐतिहासिक वस्तू संग्रहित आहेत. या वस्तू पाहताना बाबासाहेबांच्या जीवनाशी जवळून जोडले गेलेले क्षण अनुभवायला मिळाले. विशेष म्हणजे, डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी धम्मदीक्षा घेताना ज्या भगवान गौतम बुद्धांच्या मूर्तीसमोर नतमस्तक झाले, ती मूर्तीही येथे ठेवण्यात आली आहे.
याशिवाय, बाबासाहेबांनी स्वतः पेन्सिलने रेखाटलेले भगवान गौतम बुद्धांचे आकर्षक चित्र येथे आहे. या चित्रात बुद्धांचे डोळे उघडे दाखवले असून, हे चित्र या ठिकाणच्या सौंदर्याला अधिक खुलवते.
शांतीवन हे ध्यानधारणेसाठी अत्यंत शांत आणि प्रेरणादायी ठिकाण आहे. या ठिकाणच्या भेटीमुळे मनाला आनंद आणि समाधान मिळाले, असे मत आमदार रोहित पवार यांनी बोलून दाखवले.
याप्रसंगी आमदार प्रकाश गजभिये आमदार सुनील भुसारा, सलील देशमुख, ॲड. रविकांत वरपे, पंकज बोराडे, विकास लवांडे यांच्यासह स्थानिक पदाधिकारी आणि कार्यकर्ते उपस्थित होते.











Comments are closed