Shopping cart

  • Home
  • Politics
  • महापालिका निवडणुकीआधीच शिंदे गटाला धक्का;विश्वासू पदाधिकाऱ्याने घेतला राष्ट्रवादीचा झेंडा!

महापालिका निवडणुकीआधीच शिंदे गटाला धक्का;विश्वासू पदाधिकाऱ्याने घेतला राष्ट्रवादीचा झेंडा!

October 22, 20250 Mins Read
Shinde group
106

India Morning News

Share News:
Share

रायगड :  राज्यात आगामी काही आठवड्यांत स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीचा बिगुल वाजणार असतानाच राजकीय पातळीवर हालचालींना वेग आला आहे. विधानसभा निवडणुकीनंतर महाविकास आघाडीतील अनेक नेते महायुतीमध्ये दाखल झाले होते. मात्र आता उलट चित्र दिसत असून, महायुतीतीलच नेते एकमेकांच्या पक्षात जाण्याची स्पर्धा लागल्याचं दिसत आहे.

शिवसेना शिंदे गटातील काही नगरसेवकांनी नुकतंच भाजपमध्ये प्रवेश केला होता. या घडामोडींवर खासदार नरेश मस्के यांनी नाराजी व्यक्त केली होती. त्यानंतर आता शिंदे गटासाठी आणखी एक धक्कादायक बातमी समोर आली आहे. राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाने शिवसेनेच्या गोटात सेंध घातली आहे.

रायगड जिल्ह्यात सध्या शिवसेना शिंदे गट आणि राष्ट्रवादी अजित पवार गटातील संघर्ष चव्हाट्यावर आला आहे. मंत्री भरत गोगावले यांनी राष्ट्रवादीच्या बालेकिल्ल्यात घुसखोरी सुरू केली होती, तर आता सुनील तटकरे यांनी शिवसेनेच्या प्रभावशाली नेत्यांना आपल्याकडे वळवण्याची मोहीम हाती घेतली आहे.

गोगावले यांचे जवळचे सहकारी आणि शिवसेनेचे उपजिल्हाप्रमुख रमेश मोरे यांनी राष्ट्रवादी अजित पवार गटात अधिकृत प्रवेश केला आहे. सुतारवाडी येथे झालेल्या कार्यक्रमात खासदार सुनील तटकरे यांच्या उपस्थितीत मोरे यांनी राष्ट्रवादीचा झेंडा हाती घेतला. यावेळी तटकरेंनी त्यांचे आणि त्यांच्या समर्थकांचे औपचारिक स्वागत केले.

या प्रसंगी बोलताना रमेश मोरे यांनी शिवसेना शिंदे गटावर गंभीर आरोप करत पक्ष नेतृत्वावर नाराजी व्यक्त केली. त्यांच्या या निर्णयामुळे रायगड जिल्ह्यात शिंदे गटात मोठी खळबळ उडाली आहे.

दरम्यान, स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका महायुती म्हणून लढवायच्या की स्वतंत्रपणे, यावर अद्याप अंतिम निर्णय झालेला नाही. मात्र, पक्षांतराच्या हालचालींनी राज्यातील राजकीय समीकरणे पुन्हा एकदा ढवळून निघण्याची शक्यता निर्माण झाली आहे.

Share News:
Share

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Related Posts

Share