Shopping cart

  • Home
  • News
  • शिवसेना कन्हान शहर द्वारे प्राविण्य प्राप्त विद्यार्थ्यांचा सत्कार

शिवसेना कन्हान शहर द्वारे प्राविण्य प्राप्त विद्यार्थ्यांचा सत्कार

June 2, 20251 Mins Read
182

India Morning News

Share News:
Share

शहराला लवकरच भव्य ई-लायब्ररीची भेट मिळणार – राज्यमंत्री आशिष जयस्वाल

विधानसभेत सर्वाधिक गुण मिळवणाऱ्या पूजा यादव विद्यार्थीनीचा लॅपटॉप देऊन सत्कार

कन्हान:-

शिवसेना कन्हान शहर च्या वतीने इयत्ता १० वी आणि १२ वी च्या हुशार विद्यार्थ्यांचा सत्कार कार्यक्रमाचे आयोजन शनिवार (दि.३१) मे रोजी डोणेकर सभागृह येथे करण्यात आले होते . कार्यक्रमात प्रामुख्याने उपस्थित राज्याचे राज्यमंत्री आशिष जयस्वाल , उपजिल्हा प्रमुख वर्धराज पिल्ले , प्राचार्य पी के पोतदार , चंद्रकुमार चौकसे , विशाखा ठमके , ज्ञानप्रकाश यादव , मनीषा सिंग , गिरिजा शंकर यादव , एन एस मालवीय , दिवाळू देशमुख सह आदि मान्यवरांचा हस्ते भारत मातेच्या प्रतिमेला पुष्प हार माल्यार्पण आणि दीप प्रज्वलन करुन कार्यक्रमाची सुरूवात करण्यात आली . कार्यक्रमात संबोधित करतांना न्याय आणि वित्त राज्यमंत्री आशिष जयस्वाल यांनी प्रगत तंत्रज्ञानाचा वापर करून स्वतःच्या , गावाच्या आणि देशाच्या विकासाची गती वाढवण्यावर भर दिला . शहराला लवकरच एक कोटींहून अधिक खर्चाचे उच्च दर्जाचे ई-लायब्ररी दिली जाईल , असे विद्यार्थांना अवाश्वासन दिले .

कार्यक्रमात राज्यमंत्र्यांनी सर्व शाळांच्या मुख्याध्यापक आणि निवृत्त मुख्याध्यापकांचा सत्कार केला . दहावीत ८०% पेक्षा जास्त गुण मिळवणाऱ्या आणि बारावीत ७५% पेक्षा जास्त गुण मिळवणाऱ्या १७० विद्यार्थ्यांना त्यांच्या पालकांना भेटवस्तू , स्मृतिचिन्ह आणि रोपटे देऊन गौरवण्यात आले . रामटेक विधानसभेतून सर्वाधिक ९६.६% गुण मिळवून कन्हान शहराची प्रतिष्ठा वाढवणाऱ्या पूजा शमशेर यादव यांचा लॅपटॉप देऊन विशेष गौरव करण्यात आला . विद्यार्थ्यांना आणि पालकांना जेवण देऊन कार्यक्रमाची सांगता करण्यात आली .कार्यक्रमाचे सुत्र संचालन यांनी केले.

कार्यक्रमाचे आयोजन शिवसेना जिल्हा उपप्रमुख वर्धराज पिल्ले यांच्या नेतृत्वात पी.डी जयस्वाल , अमित थटेरे , शहर अध्यक्ष गज्जू गोरले , महिला शहर अध्यक्ष मनीषा चिखले , अमित मेंघरे , विजय पारधी, प्रकाश तिवारी यांनी केले होते .

कार्यक्रमाच्या यशस्वितेकरिता शुभांगी घोघले , पल्लवी भनारकर , अरविंद बावनकर , डॅनियल शेंडे , प्रदीप गायकवाड अजय चव्हाण , हरीश तिडके , अतुल यादव , धीरज देवतागण , दीपचंद शेंडे सह आदि सदस्यांनी सहकार्य केले .

कन्हान प्रतिनिधि – ऋषभ बावनकर

Share News:
Share

Comments are closed

Related Posts

Share