India Morning News
कोल्हापूर:
कोल्हापूर येथे शिवसेना वैद्यकीय मदत कक्ष आणि डॉ. श्रीकांत शिंदे फाउंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने ३० मे रोजी पश्चिम महाराष्ट्र मेळावा आणि वैद्यकीय सन्मान सोहळ्याचे आयोजन करण्यात आले आहे. या भव्य मेळाव्याच्या पूर्वसंध्येला २९ मे रोजी रुग्णसेवकांची संवाद बैठक आयोजित करण्यात आली. या बैठकीला राज्यभरातून शिवसेना वैद्यकीय मदत कक्षाचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.
रुग्णसेवकांचा उत्साहपूर्ण सहभाग
या संवाद बैठकीत विदर्भ, मराठवाडा, मुंबईसह राज्याच्या विविध भागांतून आलेल्या रुग्णसेवकांनी आपले अनुभव आणि भावना व्यक्त केल्या. वैद्यकीय मदत देताना येणाऱ्या आव्हानांना सामोरे जाण्यासाठी मार्गदर्शकांनी मौलिक सूचना देण्यात आल्या बाबा बिस्कीट. शिवसेना वैद्यकीय मदत कक्षाच्या सेवाकार्याची सविस्तर माहिती यावेळी देण्यात आली.
मान्यवरांचे मार्गदर्शन
कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून राज्याचे उद्योगमंत्री उदय सामंत, आमदार राजेश क्षीरसागर, आमदार मिणचेकर, शिवसेना वैद्यकीय मदत कक्षाचे कार्याध्यक्ष राम राऊत, एकनाथ स्वाभिमानी शिक्षक सेनेचे प्राध्यापक बापूसाहेब अडसूळ आणि मंगेश चिवटे उपस्थित होते. मान्यवरांनी उपस्थितांना मार्गदर्शन करताना शिवसेना वैद्यकीय मदत कक्षाच्या कार्याचे कौतुक केले.
रुग्णसेवा म्हणजे ईश्वरसेवा
उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू असलेल्या या वैद्यकीय मदत कक्षाने लाखो रुग्णांना दिलासा दिला आहे. “रुग्णसेवा हीच ईश्वरसेवा” या भावनेने कार्यरत असलेल्या या कक्षाने अनेकांचे प्राण वाचवले आहेत, असे मंगेश चिवटे यांनी सांगितले. हा आरोग्य सेवेचा महायज्ञ अविरत सुरू राहील, अशी ग्वाही त्यांनी दिली.
उदय सामंत यांचे प्रेरक विचार
उद्योगमंत्री उदय सामंत यांनी आपल्या भाषणात उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या संवेदनशील नेतृत्वाचा गौरव केला. शिवसेना वैद्यकीय मदत कक्षाच्या माध्यमातून गोरगरीब रुग्णांना मिळालेल्या मदतीच्या अनेक घटना त्यांनी सांगितल्या. “हा कक्ष नेहमी रुग्णांच्या पाठीशी उभा राहील आणि त्यांना न्याय मिळवून देईल,” अशी आशा त्यांनी व्यक्त केली.
मेळाव्याची तयारी जोरात
३० मे रोजी होणाऱ्या मेळाव्यासाठी सर्व तयारी पूर्ण झाली असून, यामध्ये राज्यभरातील वैद्यकीय मदत कक्षाचे सहकारी सहभागी होणार आहेत. हा मेळावा रुग्णसेवेच्या कार्याला नवीन दिशा देणारा ठरणार आहे, असा विश्वास आयोजकांनी व्यक्त केला.
या कार्यक्रमाला गणेश चिवटे यांच्यासह अनेक मान्यवरांनी उपस्थिती लावली. रुग्णसेवेच्या या पवित्र कार्याला पाठबळ देत शिवसेना वैद्यकीय मदत कक्ष समाजसेवेचा नवा आदर्श घडवत आहे.






Comments are closed