Shopping cart

  • Home
  • News
  • गुणवंत विद्यार्थांचा सत्काराने शिवराज्याभिषेक सोहळा थाटात

गुणवंत विद्यार्थांचा सत्काराने शिवराज्याभिषेक सोहळा थाटात

June 8, 20251 Mins Read
61

India Morning News

Share News:
Share

कन्हान : – सकल हिंदू समाज कन्हान क्षेत्र च्या वतीने दहावी आणि बारावीच्या गुणवंत विद्यार्थांचा सत्कार करुन शिवराज्याभिषेक सोहळा दिवस थाटाज साजरा करण्यात आला .

शुक्रवार (दि.६) जुन :-

शिवराज्याभिषेक सोहळा दिवस निमित्य सकल हिंदू समाज कन्हान क्षेत्र द्वारे दहावी आणि बारावीच्या गुणवंत विद्यार्थांचा भव्य सत्कार सोहळा कार्यक्रमाचे आयोजन तारसा चौक येथे करण्यात आले . कार्यक्रमात प्रामुख्याने उपस्थित जेष्ठ सामाजसेवक जीवन मुंगले , जेष्ठ नागरिक भरत सावळे , नारायण गजभिए , माजी नगरसेवक राजेंद्र शेंदरे , बळीरामजी दखने हायस्कुल कन्हान च्या माजी मुख्याध्यापिका सौ.विशाखा ठमके यांच्या हस्ते छत्रपती शिवाजी महाराज आणि राजमाता जिजाऊ यांच्या प्रतिमेला पुष्प हार अर्पण करुन “छत्रपती शिवाजी महाराजांचा विजय असो , जय भवानी , जय शिवाजी , तुमच आमच नात काय जय जिजाऊ जय शिवराय ” अश्या जयघोषाने कार्यक्रमाची सुरूवात करण्यात आली . कार्यक्रमात दहावी आणि बारावीत ७५ टक्के पेक्षा जास्त अंक प्राप्त करणाऱ्या विद्यार्थांचा मोमेंटो आणि सम्मान पत्र देऊन सत्कार करण्यात आला .

यावेळी जीवन मुंगले आणि माजी मुख्याध्यापिका विशखा ठमके यांनी शिवराज्याभिषेक दिवसा वर उपस्थितांना मार्गदर्शन केले व विद्यार्थांचे कौतुक करुन त्यांना भविष्याचे मार्गदर्शन करुन शुभेच्छा दिल्या . शिवशंभु आखाड्याचा खेळाडुंनी आपल्या कला , कौशल्यपुर्ण व विविध खेळाचे उत्कृष्ट प्रदर्शन करुन उपस्थितांचे मन मोहित केले . एका महिन्यापुर्वी शिर्डीत पार पडलेल्या राज्यस्तरीय सिलंबम स्पर्धेत एकुण चार मेडल जिंकुन कन्हान शहराचे नाव रोशन करणाऱ्या शिवशंभु आखाड्याचे कोच अनिकेत निमजे , कु.जानवी पारधी , कु.निधी नाईक , कु.ऋतुजा वंजारी , कुमार.हर्षल कोसरे यांना मोमेंटो आणि सम्मान पत्र देऊन सत्कार करण्यात आला . राष्ट्रगीताने कार्यक्रमाची सांगता करण्यात आली . कार्यक्रमाचे सुत्र संचालन आणि आभार प्रदर्शन ऋषभ बावनकर यांनी केले .

या प्रसंगी कन्हान ग्रामीण पत्रकार संघाचे अध्यक्ष मोतीराम रहाटे , बिरेंद्र सिंह , निलकंठ मस्के , शैलेश शेळके , गज्जु गोरले , रिंकेश चवरे , अभिजीत चांदुरकर , सनोज पनिकर , आकाश पंडितकर , रोहित मानवटकर सह आदि नागरिक उपस्थित होते .

कार्यक्रमाच्या यशस्वितेकरिता सकल हिंदू समाज कन्हान क्षेत्राचे अध्यक्ष शुभम बावनकर , हिमांशु सावरकर , अनिकेत निमजे , ऋषभ बावनकर , हर्षल सावरकर , लोकेश दमाहे , चेतक पोटभरे , जीवन नांदुरकर , अजय पाली , मनीष इंगोले , शैलेश चकोले , सार्थक पोटभरे , आयुष संतापे सह आदि सदस्यांनी सहकार्य केले .

कन्हान प्रतिनिधि – ऋषभ बावनकर

Share News:
Share

Comments are closed

Related Posts

Share