Shopping cart

  • Home
  • News
  • नगरधन सिलंबम स्पर्धेत शिवशंभु आखाडा टीम ने द्वितीय क्रमांका सह खेळाडुंनी १८ मेडल पटकावले

नगरधन सिलंबम स्पर्धेत शिवशंभु आखाडा टीम ने द्वितीय क्रमांका सह खेळाडुंनी १८ मेडल पटकावले

June 17, 20251 Mins Read
395

India Morning News

Share News:
Share

 

कन्हान:- शिवशंभु आखाड्याच्या खेळाडुंनी नगरधन सिलंबम चैंपियनशिप स्पर्धेत सहभाग घेऊन १८ मेडल प्राप्त करुन द्वितीय क्रमांक पटकाविल्याने कन्हान परिसरातुन कौतुकाचा वर्षाव होत आहे.

छत्रपती बहुउद्देशीय संस्था नगरधन “बेटी बचाओ बेटी पढाओ ” कराटे ग्रुप नगरधन आणि धोपटे मित्र परिवार यांच्या संयुक्त विद्यमाने कोठेश्वर देवस्थान परिसर नगरधन येथे रविवार (दि.१५) जुन रोजी सिलंबम चैंपियनशिप स्पर्धेचे आयोजन करण्यात आले .

कार्यक्रमाचे अध्यक्ष राज्याचे राज्यमंत्री आशिष जयस्वाल , प्रमुख अतिथि जि.प.नागपुर माजी सभापती वर्षा धोपटे , नगरधन ग्रामपंचायत सरपंच माया दमाहे , उपसरपंच राम धोपटे , महाराष्ट्र थाय बाॅक्सींग असोसिएशन सेक्रेटरी अजय खेडगरकर , समाजसेवक नरेश धोपटे , इंडिया महिली गल्फ रेफ्री शुभांगी सहारे यांचा हस्ते छत्रपती शिवाजी महाराज यांचा प्रतिमेला पुष्प हार अर्पण करुन कार्यक्रमाची सुरूवात करण्यात आली . या स्पर्धेत रामटेक आणि पारशिवनी तालुक्यातील एकुण ८ टीम ने सहभाग घेतला होता .

कन्हान परिसरातील शिवशंभु आखाड्याचा खेळाडुंनी कोच अनिकेत निमजे यांचा मार्गदर्शनात नगरधन सिलंबम स्पर्धेत सहभाग घेतला . भावेश मस्के (स्वर्ण पदक) , त्रिशिका कारस्कर (स्वर्ण पदक) , आनंदी मोहोड (रजत पदक) , अंशू मेश्राम (स्वर्ण पदक) , अंतरा धोटे (स्वर्ण पदक) , वैदेही बडवाईक (स्वर्ण पदक) , हर्षल कुंभलकर (रजत पदक) , जानवी अंबिलडुके (रजत पदक) , ऋषित मांधरे (रजत पदक) , आदित्य मांधरे (कांस्य मेडल) यश टेंभुर्णे (कांस्य पदक) शिवण्या बोरकर (स्वर्ण पदक) , सांझ गुप्ता (स्वर्ण पदक) , भाग्यश्री दोडके (स्वर्ण पदक) , मान्यता मोठघरे (रजत पदक) , ओम सावरकर (स्वर्ण पदक) , गौरव मदन (स्वर्ण पदक) , सावेरी वासनिक (रजत पदक) या खेळाडुंनी आपल्या कला , कौशल्यपुर्ण व विविध खेळाचे उत्कृष्ट प्रदर्शन करुन एकुण १८ विविध पदक प्राप्त करीत स्पर्धेत द्वितीय क्रमांक पटकावुन कन्हान शहराचे नाव रोशन केले .

शिवशंभु आखाड्याचे कोच अनिकेत निमजे यांचा मार्गदर्शनात दररोज तरुण मुलांना , मुलींना विविध खेळाचे व्यवसायिक प्रशिक्षण दिले जाते . खुप कमी वेळात अनिकेत निमजे यांनी सर्व खेळाडुंना व्यवस्थित प्रक्षिक्षण देऊन तयार केले . त्यांचा प्रयत्नाने व खेळाडुंचा उत्कृष्ट प्रदर्शनाने शिवशंभु आखाड्याचा खेळाडुंनी शिर्डीत राज्यस्तरीय सिलंबम स्पर्धेत चार पदक आणि नगरधन सिलंबम स्पर्धेत अठरा पदक प्राप्त केल्याने परिसरातील नागरिकांन कडुन खेळाडुंवर कौतुकाचा वर्षाव होत आहे .

Share News:
Share

Comments are closed

Related Posts

Share