India Morning News
मोहोळ: सोलापूर जिल्ह्याच्या नव्या जिल्हा शल्य चिकित्सक म्हणून पदभार स्वीकारलेल्या डॉ. वर्षा डोईफोडे यांचा शासकीय कार्यरत कमिटीच्या सदस्यांनी सत्कार केला. जिल्हा रुग्णालयात आयोजित या समारंभात डॉ. डोईफोडे यांचे वैद्यकीय क्षेत्रातील योगदान आणि समाजसेवेची प्रशंसा करण्यात आली. सोलापूरच्या जिल्हा शल्य चिकित्सकपदावर प्रथमच महिला नियुक्त झाल्याबद्दल त्यांचे विशेष अभिनंदन करण्यात आले.
विधी सेवा प्राधिकरणाचे सदस्य व विधी स्वयंसेवक रामलिंग महामुनी तसेच रुग्ण कल्याण समिती सदस्य आणि लीगल सर्विस युनिट फॉर चिल्ड्रन व मनोन्याय समिती सदस्य राजन घाडगे यांनी डॉ. डोईफोडे यांना शाल व पुष्पहार देऊन सन्मानित केले. यावेळी डॉ. श्रीकांत कुलकर्णी, डॉ. आशा घोडके यांच्यासह अन्य वैद्यकीय अधिकारी उपस्थित होते.
डॉ. डोईफोडे यांनी आपल्या मनोगतात सांगितले, “जिल्ह्यातील आरोग्य सेवा अधिक सक्षम आणि लोकाभिमुख करण्यासाठी मी कटिबद्ध आहे. रुग्णांना दर्जेदार आणि तात्काळ सेवा मिळवून देणे हेच माझे प्रथम उद्दिष्ट आहे.” त्यांच्या या दृष्टिकोनाचे उपस्थितांनी कौतुक केले. सोलापूरच्या आरोग्य यंत्रणेला नवे नेतृत्व मिळाल्याने रुग्णसेवेत सुधारणा होईल, अशी अपेक्षा व्यक्त होत आहे. या सत्कार समारंभाने डॉ. डोईफोडे यांच्या नव्या जबाबदारीला शुभेच्छा देण्याचा आणि त्यांच्या कार्याला प्रोत्साहन देण्याचा उद्देश साध्य झाला.











Comments are closed