Shopping cart

  • Home
  • Solapur
  • सोलापूरात शिवसेना जिल्हाप्रमुखावर जीवघेणा हल्ला

सोलापूरात शिवसेना जिल्हाप्रमुखावर जीवघेणा हल्ला

October 4, 20250 Mins Read
सोलापूर शिवसेना जिल्हाप्रमुख हल्ला
139

India Morning News

Share News:
Share

सोलापूर: करमाळा तालुक्यात आज सकाळी घडलेली धक्कादायक घटना राज्याच्या राजकारणाला हादरा देणारी ठरली आहे. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे ओएसडी मंगेश चिवटे यांचे मोठे बंधू आणि शिवसेनेचे जिल्हाप्रमुख महेश चिवटे यांच्यावर हिवरवाडी परिसरात शेतात प्राणघातक हल्ला झाला.

घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत पंचनामा केला असून तपास सुरू आहे.

जखमी महेश चिवटे यांनी उपचारादरम्यान गंभीर आरोप केले की, “हा हल्ला दिग्विजय बागल आणि रश्मी बागल कोलते यांच्यासह सुपारी देऊन रचला गेला आहे.” या वक्तव्यामुळे सोलापूरमधील राजकीय वातावरण तापले आहे.

दिग्विजय बागल हे अलीकडच्या निवडणुकीत शिंदे गटाचे उमेदवार होते, तर त्यांची बहीण रश्मी बागल कोलते भाजपच्या महिला आघाडीच्या प्रमुख आहेत. या आरोपामुळे शिवसेना–भाजप वाद पुन्हा उफाळून आला आहे.

पोलिस निरीक्षक रणजीत माने यांच्या मार्गदर्शनाखाली तपास वेगाने सुरू असून संपूर्ण जिल्ह्यात या घटनेमुळे तणावाचे वातावरण आहे.

Share News:
Share

Comments are closed

Related Posts

Share