Shopping cart

  • Home
  • Pune
  • महाराष्ट्रात सौर क्रांतीचा प्रारंभ: मुख्यमंत्री फडणवीस यांच्या हस्ते महाऊर्जाच्या नवीन इमारतीचे उद्घाटन

महाराष्ट्रात सौर क्रांतीचा प्रारंभ: मुख्यमंत्री फडणवीस यांच्या हस्ते महाऊर्जाच्या नवीन इमारतीचे उद्घाटन

June 8, 20250 Mins Read
37

India Morning News

Share News:
Share

पुणे: महाराष्ट्राचे मुख्यमंत्री मा. श्री. देवेंद्रजी फडणवीस यांच्या हस्ते आज औंध, पुणे येथे महाराष्ट्र ऊर्जा विकास अभिकरण (महाऊर्जा) च्या नवीन प्रशासकीय इमारतीचे भव्य उद्घाटन झाले. याप्रसंगी मुख्यमंत्र्यांनी महाऊर्जामार्फत आस्थापित प्रकल्पांचा प्रगती अहवाल प्रकाशित केला.

“सौर ऊर्जा हे भविष्यातील विजेची गरज पूर्ण करण्याचे प्रभावी माध्यम आहे. डिसेंबर २०२५ पर्यंत महाराष्ट्रातील सर्व शासकीय कार्यालये सौर ऊर्जेवर संचालित होतील, तर २०३० पर्यंत राज्यातील ५२% वीजनिर्मिती ही अपारंपारिक ऊर्जा स्रोतांमधून होईल. पहिल्या टप्प्यात १०० युनिट आणि दुसऱ्या टप्प्यात ३०० युनिटपर्यंत वीज वापरणाऱ्या ग्राहकांना सौर ऊर्जेवर आणण्यात येईल, जेणेकरून ग्राहकांना शून्य वीज बिल मिळेल,” असा ठाम विश्वास मुख्यमंत्री श्री. देवेंद्रजी फडणवीस यांनी आपल्या भाषणात व्यक्त केला.

या कार्यक्रमाला राज्याचे कॅबिनेट मंत्री श्री. अतुल सावे, विधानसभा उपाध्यक्ष श्री. अण्णा बनसोडे, विधानपरिषदेच्या उपसभापती डॉ. नीलमताई गोऱ्हे, राज्यसभा खासदार सौ. मेधा कुलकर्णी, खासदार श्री. श्रीरंग बारणे, आमदार श्री. भीमराव तापकीर, आमदार सौ. उमाताई खापरे, माजी आमदार श्री. जगदीश मुळीक, महापालिका आयुक्त श्री. नवल किशोर राम, जिल्हाधिकारी श्री. जितेंद्र डूडी, महाऊर्जाच्या महासंचालक डॉ. कादंबरी बलकवडे, महाराष्ट्र राज्य वीज कंपनीचे संचालक श्री. विश्वास पाठक, महाऊर्जाच्या अतिरिक्त महासंचालक डॉ. त्रिगुण कुलकर्णी यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते.

Share News:
Share

Comments are closed

Related Posts

Share