Shopping cart

  • Home
  • News
  • समता पंधरवाड्यानिमित्त जात प्रमाणपत्र पडताळणीसाठी 15 एप्रिलपर्यंत विशेष मोहीम

समता पंधरवाड्यानिमित्त जात प्रमाणपत्र पडताळणीसाठी 15 एप्रिलपर्यंत विशेष मोहीम

April 9, 20251 Mins Read
57

India Morning News

Share News:
Share

नागपूर,दि.8 : भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीचे औचित्याने जिल्हा जात प्रमाणपत्र पडताळणी समिती, नागपूर यांच्यामार्फत समता पंधरवाड्याचे आयोजन करण्यात आले आहे. समता पंधरवड्यामध्ये नागपूर जिल्हयातील अकरावी व बारावी विज्ञान शाखेत सन 2025-26 या शैक्षणिक वर्षात प्रवेशित सर्व मागासवर्गीय विद्यार्थ्यांना जात वैधता प्रमाणपत्र उपलब्ध करुन देण्यासाठी 15 एप्रिलपर्यंत विशेष मोहिमेचे आयोजन करण्यात आले आहे.

सन 2024-25 मध्ये बारावी विज्ञान व व्यावसायिक अभ्यासक्रमात प्रवेशित विद्यार्थी अनुसूचित जाती, विमुक्त जाती व भटक्या जमाती, इतर मागासवर्ग व विशेष मागासप्रवर्ग या सर्व प्रवर्गातील जिल्ह्यातील जात प्रमाणपत्रधारक विद्यार्थ्यांनी जिल्हा जात प्रमाणपत्र पडताळणी समितीकडे अर्ज यापूर्वीच सादर केले आहेत व ज्या अर्जदारांचे प्रकरणे त्रुटीपूर्ततेअभावी समितीकडे प्रलंबीत आहेत अशा अर्जदारांना वारंवार ऑनलाईनद्वारे एसएमएस, लेखी पत्राद्वारे व दुरध्वनीद्वारे त्रुटी पूर्ततेबाबत कळवूनही अर्जदारांनी अद्यापपर्यंत त्रुटीपूर्तता केलेली नाही. अशा अर्जदारांची प्रकरणे निकाली काढण्यासाठी विशेष मोहीम राबविण्यात येत असल्याचे जिल्हा जात पडताळणी समितीचे उपायुक्त डॉ. मंगेश वानखेडे यांनी कळविले आहे.

Share News:
Share

Comments are closed

Related Posts

Share