India Morning News
मुंबई : काश्मीरमधील घटनांनंतर तिथे अडकलेल्या महाराष्ट्रातील नागरिकांना परत आणण्यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिलेल्या आदेशानुसार आज, २४ एप्रिल रोजी श्रीनगरहून मुंबईसाठी विशेष विमान सेवा सुरू करण्यात आली आहे. इंडिगोच्या या विशेष फ्लाइटद्वारे आज ८३ प्रवासी सुरक्षितरित्या मुंबईला पोहोचणार आहेत. राज्य सरकारच्या पुढाकारामुळे आणि केंद्रीय मंत्री मुरलीधर मोहोल यांच्या सहकार्यामुळे ही सुविधा उपलब्ध झाली आहे.
आणखी एका फ्लाइटची तयारी सुरू
आज (गुरुवार) आणखी एका विशेष फ्लाइटची तयारी सुरू असून, त्यासाठी प्रवाशांची यादीही तयार केली जात आहे. काश्मीरमध्ये अडकलेल्या महाराष्ट्रातील उर्वरित नागरिकांना सुरक्षित परत आणण्यासाठी हे प्रयत्न सुरू आहेत. या संपूर्ण विशेष विमान सेवेचा खर्च राज्य सरकार उचलणार असून, नागरिकांच्या सुरक्षेसाठी हे पाऊल उचलण्यात आल्याची माहिती अधिकृत सूत्रांनी दिली आहे. राज्य सरकारच्या या तत्परतेमुळे अनेक कुटुंबांना दिलासा मिळाला असून, पुढील काही दिवसांत उर्वरित प्रवाशांनाही परत आणण्यासाठी व्यवस्था करण्यात येणार आहे.










Comments are closed