India Morning News
अमरावती : तिरुपती बालाजीच्या दर्शनासाठी महाराष्ट्रातून जाणाऱ्या भाविकांसाठी रेल्वे प्रशासनाने मोठी आनंदाची बातमी दिली आहे. अमरावती ते तिरुपती यादरम्यान धावणाऱ्या विशेष गाडीची मुदत संपत असतानाच, आता या गाडीला 29 जानेवारी 2026 पर्यंत मुदतवाढ देण्यात आली आहे. त्यामुळे डिसेंबर किंवा जानेवारीमध्ये तिरुपतीला जाण्याचा विचार करणाऱ्या भाविकांना मोठा दिलासा मिळणार आहे.
तिरुपती बालाजी हे देशातील सर्वाधिक लोकप्रिय आणि श्रद्धास्थान असलेले मंदिर. महाराष्ट्रातून दरवर्षी लाखो भाविक तिरुपतीला जातात. वाढलेल्या गर्दीचा आणि प्रवाशांकडून मिळालेला उत्तम प्रतिसाद लक्षात घेऊन ही विशेष गाडी सुरू करण्यात आली होती. आता प्रवाशांच्या सोयीसाठी तिचे फेरे कायम ठेवण्याचा निर्णय रेल्वेने जाहीर केला आहे.
या निर्णयामुळे अमरावती, अकोला, वाशिम आणि हिंगोली जिल्ह्यांतील प्रवाशांना विशेषतः फायदा होणार आहे. भाविकांसाठी जलद, सुरक्षित आणि सोयीस्कर प्रवासाची ही मोठी सुविधा ठरणार आहे.
अमरावती–तिरुपती स्पेशल ट्रेनचे वेळापत्रक-
अमरावती–तिरुपती एक्स्प्रेस-
आठवड्यातून दोनदा
सुटते : सोमवार आणि गुरुवार सकाळी 6.45 वाजता (अमरावतीहून)
पोहोचते : दुसऱ्या दिवशी पहाटे 6.25 वाजता (तिरुपती)
तिरुपती–अमरावती एक्स्प्रेस-
आठवड्यातून तीनदा
सुटते : मंगळवार, गुरुवार आणि शनिवार दुपारी 3.45 वाजता (तिरुपतीहून)
पोहोचते : दुसऱ्या दिवशी दुपारी 3.10 वाजता (अमरावती)










