Shopping cart

  • Home
  • Politics
  • कन्हान येथे ऑपरेशन सिंदूर सन्मानार्थ तिरंगा यात्रेला उस्फूर्त प्रतिसाद

कन्हान येथे ऑपरेशन सिंदूर सन्मानार्थ तिरंगा यात्रेला उस्फूर्त प्रतिसाद

May 31, 20251 Mins Read
379

India Morning News

Share News:
Share

कन्हान : – पहलगाम येथे झालेल्या भ्याड दहशतवादी हल्ल्याच्या प्रत्युत्तरार्थ भारतीय सेनादलांनी ऑपरेशन सिंदूरच्या माध्यमातून केलेल्या महापराक्रमाच्या सन्मानार्थ कन्हान येथे भव्य सिंदूर ऑपरेशन तिरंगा यात्रा शुक्रवार दि.३० मे रोजी आंबेडकर चौक ते शहीद चौक पर्यंत काढण्यात आली.

या कार्यक्रमात नागरिकांनी सहभागी होऊन देशाचा व सैनिकांच्या सन्मानार्थ ९० मीटर तिरंगा ची रॅली काढून भारत माता की जय , वंदे मातरम अश्या विविध प्रकारचे जयघोष उत्साहवर्धक नारे लावण्यात आले . कार्यक्रमात तिरंगा ध्वज तसेच संगीतमय वातावरणात देशभक्ती गाणे वाजविण्यात आले. कार्यक्रमांमध्ये देशाचे माजी सैनिकांचा सत्कार करण्यात आला . तिरंगा यात्रा भाजपा नागपुर ग्रामीण जिल्हाध्यक्ष आनंदराव राऊत , माजी आमदार डी मल्लिकार्जुन रेड्डी , महामंत्री अनील निधान , महामंत्री रिंकेश चवरे , कन्हान मंडळ अध्यक्ष बिरेंद्र सिंह यांचा नेतृत्वात काढण्यात आली . तिरंगा यात्रेची सुरुवात डॉ.बाबासाहेब आंबेडकर चौक येथे विश्वरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करुन करण्यात आली आणि समापन शहिद चौक कन्हान येथे करण्यात आले .

कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी भाजपा मंडळ अध्यक्ष बिरेंद्र सिंग यांची महत्त्वाची योगदान लाभले . कार्यक्रमात डॉ.मनोहर पाठक , गजानन आसोले , राजेंद्र शेंदरे , विनोद किरपान , अजय लोंढे , विनोद कोहळे , जितेंद्र बावनकुळे , अतुल हजारे , सौरभ पोटभरे , आकाश वाढणकर , विशाल चापले , लाकेश्वर वासाळे , सुरेंद्र बुधे , देवेंद्र सैंगर , मनोज कुरडकर , सचिन वासनिक , कामेश्वर शर्मा , अमोल साकोरे , आनंद शर्मा , सुरेश कळंबे , गुरुदेव चकोले , ऋषभ बावनकर , शुभम बावनकर , सनोज पनिकल , नरेश आरबी , विक्की सोलंकी , शिवाजी चकोले , चंद्रगुप्त पानतावणे , सचिन कांबळे , मयूर माटे , आकाश पंडितकर , जयप्रकाश वर्मा , विलास हुड , व्यंकटेश कारेमोरे , समीर मेश्राम , उमेश पोनिकर , जयप्रकाश वर्मा , उदयभान चव्हाण , पूरन प्रताप सिंग , परमेश्वर तिवारी , प्रणय खवले , राम जुनघरे , अजय खंताय , राहुल ढोके , महेंद्र चव्हान , महेंद्र साबरे , वर्षा लोंढे , पोर्णिमा दुबे , प्रतीक्षा चवरे , सुषमा चोपकर , मोनिका पोनिकर , वंदना कुरडकर , मीनाताई कळंबे , संगीता खोब्रागडे , अनिता पाटील , सरिता लसुंते , श्रुती किरपाणे, रंजना किरपाणे सह आदि नागरिक मोठ्या संख्येत उपस्थित होते .

कन्हान प्रतिनिधि – ऋषभ बावनकर

Share News:
Share

Comments are closed

Related Posts

Share