Shopping cart

  • Home
  • News
  • राज्य सरकारचा ‘डिजिटल मंत्रिमंडळ’साठी मोठा निर्णय; मंत्र्यांसाठी खास आयपॅडची खरेदी

राज्य सरकारचा ‘डिजिटल मंत्रिमंडळ’साठी मोठा निर्णय; मंत्र्यांसाठी खास आयपॅडची खरेदी

June 5, 20251 Mins Read
137

India Morning News

Share News:
Share

मुंबई:-

राज्य मंत्रिमंडळाच्या कामकाजात आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर वाढवण्यासाठी सरकारने महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. ई-कॅबिनेट प्रणालीला गती देण्याच्या उद्देशाने आता मंत्र्यांसाठी विशेष प्रकारच्या डिजिटल उपकरणांची खरेदी करण्यात आली आहे. या खरेदीवर सरकारने तब्बल 1 कोटी 6 लाख 57 हजार 583 रुपयांचा खर्च मंजूर केला आहे.

काय खरेदी केलं सरकारने?
या योजनेंतर्गत 50 आयपॅड, 50 मॅजिक कीबोर्ड, 50 अ‍ॅपल पेन्सिल आणि 50 कव्हर्स खरेदी करण्याचे आदेश देण्यात आले आहेत. संबंधित कंपनीला ही उपकरणं एका आठवड्यात पुरवण्याच्या सूचना दिल्या आहेत.

प्रत्येक उपकरणासाठी इतका खर्च –
एक आयपॅड – 1,65,843

मॅजिक कीबोर्ड – 31,188

अ‍ॅपल पेन्सिल – 7,268

कव्हर – 8,850

ही खरेदी रेडियस सिस्टीम्स या कंपनीकडून करण्यात आली आहे. यासाठीची निविदा 13 मे 2025 रोजी खुली करण्यात आली होती. याआधी 9 एप्रिल रोजी निविदा जाहीर झाली होती, मात्र कोणतीही पात्र कंपनी पुढे आली नव्हती. दुसऱ्या टप्प्यात सर्व निकष पूर्ण करणाऱ्या कंपनीची निवड करण्यात आली.

कागदविरहित मंत्रिमंडळाचा प्रयत्न
सरकारच्या माहितीनुसार, मंत्रिमंडळाच्या बैठका आता कागदविरहित पद्धतीने घेण्याचा निर्णय घेण्यात आला असून, यामुळे प्रशासनाचे काम अधिक गतिमान आणि पारदर्शक होईल, अशी अपेक्षा आहे. ई-कॅबिनेटच्या अंमलबजावणीसाठी हा टप्पा महत्त्वाचा मानला जात आहे.सरकारने हा खर्च करताना स्पष्ट केलं आहे की, यामुळे भविष्यात कागदपत्रांचा वापर कमी होईल, वेळ वाचेल आणि कामात कार्यक्षमता वाढेल. मात्र, या डिजिटल खर्चावर विरोधकांकडून टीका होण्याची शक्यता नाकारता येत नाही.

Share News:
Share

Comments are closed

Related Posts

Share