India Morning News
नगरपरिषदेच्या कर्मचाऱ्यांकडून मालमत्ता कर आकारणी करून नागरिकांना न्याय देण्याची गरज
तुमसर (९ जून, भंडारा) : शहरात एबीएस स्पेटीयल टेक असोसिएट एजन्सीकडून झालेली मालमत्ता कर आकारणी रद्द करून नगरपरिषदेच्या कर्मचाऱ्यांकडून कर आकारणी करण्यात यावी. एबीएस एजन्सीकडून मालमत्ता कर पाच ते सहा पट भरमसाट वाढवून सामन्य जनतेची लूट करत आहेत. नगरपरिषद येथील कर विभागातील कर्मचाऱ्यांना नव्याने मालमत्ता कर आकारणीसाठी विश्वासात न घेता एकतर्फी कर आकारणी करण्यात आल्याची चर्चा शहरात सुरु आहे. मालमत्ता कर आकारणी करतेवेळी प्राधीकृत मूल्याकंन अधिकाऱ्यांनी निश्चित केलेल्या दराप्रमाणे क्षेत्रानुसार आकारणी न करता प्रथम क्षेत्राप्रमाणे सरसकट कर आकारणी करण्यात आले आहे. ज्या भागामध्ये रस्ते नाली व पथदिवे अश्या कोणत्याच मूलभूत सोय उपलब्ध नसतांनी सुध्दा दलित वस्ती भाग असल्याने त्याठिकाणी गोर गरीब व मोलमजुरी करणारे नागरिक राहातात अश्या मालमत्ता कर धारकांवर चौपट प्रस्तावित व भरमसाट दराने कर आकारणी करण्यात आली आहे. सदर मालमत्ता कर आकारणी करतेवेळी मूळ घर मालकाचे नावाची शाहनिशा न करता चुकीचे नाव नमूद करून एकाच घराचे तीन- तीन भाग करण्यात आले आहे. तसेच परिवाराचे लोकांना भाडेकरू सांगून दहा ते वीस पटीने मालमत्ता कर आकारणी करण्यात आली आहे. एबीएस स्पेटीयल असोसिएयेट एजन्सीकडून संपूर्ण तुमसर शहरामध्ये अप्रशिक्षित कर्मचाऱ्यांकडून तात्पुरती नेमणूक करून थातूरमातूर व अपूर्णपणे सर्वे करण्यात आले. सदर कंत्राट ७५ ते ८० लाखाचा असल्याची माहिती आहे. त्यामुळे संबंधीत एजेन्सीला आर्थिक लाभ देण्यासाठी हा ठेका देण्यात आला होता का? सदर कामाची सखोल चौकसी करून याप्रकरणी उचित कारवाई करावी तसेच नव्याने केलेल्या मालमत्ता कर आकारणीमुळे शहरातील नागरिकांमध्ये प्रशासनाप्रति असंतोष निर्माण झाले आहे त्यामुळे नागरिकांची गैरसोय टाळण्यासाठी वरील मुद्देनिहाय यावर विचार विनियम करून नागरिकांना न्याय देऊन जुन्या पद्धतीने मालमत्ता कर आकारणी पूर्वरत करण्याचे निर्देश द्यावे अशी मागणी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीने नगरपरिषदेचे मुख्याधिकारी जुम्मा प्यारेवाले यांना निवेदनाद्वारे करण्यात आली. तसेच या निवेदनाची प्रत प्राधिकृत मूल्यांकन अधिकारी, तथा सह-संचालक, नगररचना विभाग, भंडारा यांना देण्यात आली. यावेळी स्वराज्य युवा एकता फाउंडेशनचे संस्थापक अध्यक्ष तथा शिवसेनेचे विभागप्रमुख प्रमुख अमित एच मेश्राम, मनीष गजभिये, हर्षल अंबिलडुके, शुभम तिजारे, हेमंत पंचबुद्धे, नयन ढबाले, शुभम तांडेकर, शाकीब शेख, भूषण पंचबुद्धे, अभय कुंभलकर, लंकेश पारधी, शुभम भोयर उपस्थित होते.
नगरपरिषदेकडून प्रस्तावित एकत्रित वाढिव मालमत्ता कर आकारणी सर्वसामान्य नागरिकांवर अन्याकारी भरमसाठ मालमत्ता कर लादण्यात आले आहे. जर वाढिव कर सबंधी कार्यवाही थांबविण्यात आली नाही तर जनतेमध्ये उद्रेक निर्माण होईल त्यामुळे तात्काळ वाढीव मालमत्ता कर रद्द करण्यात यावे.
अमित एच मेश्राम, शिवसेना विभागप्रमुख तुमसर, भंडारा जिल्हा. (ठाकरे गट)
शहरात जेवढेही जुने बांधकाम आहे त्याच्या कर दुप्पटीपेक्षा जास्त होणार नाही आणि जे नवीन बांधकाम आहे त्याची कर आकारणी नियमानुसार करण्यात येईल जर ज्यांना यावर मालमत्ता कर आकारणीवर आक्षेप असेल त्यांनी नगरपरिषद येथे अर्ज सादर करावे नियमानुसार त्यांची सुनावणी घेऊन कर कमी करण्यात येईल सदर नागरिकांना दिलेला नोटीस हे अंतिम नसून हा एक प्रारूप प्रस्तावित वाढ आहे.
-जुम्मा प्यारेवाले, मुख्याधिकारी तथा प्रशासक नगरपरिषद तुमसर.









Comments are closed