India Morning News
मुंबई: उद्धव ठाकरे यांच्या भाषणानंतर शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) नेत्या सुषमा अंधारे यांनी शिंदे गटावर तीव्र टीका केली.
त्यांनी म्हटलं, “उद्धवसाहेबांच्या भाषणाला पावसातही हजारो लोक बसून राहिले. हे निष्ठावंतांचा मेळावा आहे. शिंदे यांच्या कार्यक्रमाला मात्र भाडोत्री गर्दी होती, जी भाषणादरम्यानच निघून गेली. त्यामुळे गेट बंद करावे लागले.”
अंधारे यांनी पुढे शिंदे यांच्या भाषणाला “तोच जुना प्रयत्न” म्हणत, “उद्धवसाहेबांनी शिंदेंचा उल्लेखही केला नाही, मात्र शिंदेंचं मन सतत कुरतडत होतं,” असे टोले लगावले.
त्यांनी कदम परिवारावरही निशाणा साधत, “कदमांचं कोकणातील अस्तित्व संपलंय. मुलगा टक्केवारीचं राजकारण करतो, आईच्या नावावर डान्सबार चालवतो,” अशी टीका केली.
प्रताप सरनाईकांवर थेट आरोप करताना अंधारे म्हणाल्या, “थुंकून चाटायची सवय ही गद्दारांचीच. शेकडो कोटी कमावले तरी भावाच्या विधवेला मदत करण्यास टाळाटाळ केली. अशा मानसिकतेच्या लोकांनी निराधार शब्द वापरू नयेत.”






Comments are closed