India Morning News
कन्हान : –
कन्हान पोलीस स्टेशन अंतर्गत खंडाळा शिवारातुन स्थानिक गुन्हे शाखा नागपुर ग्रामीण पथकाने अवैध विनापरवाना वाळुची वाहतुक करणाऱ्या वाहनांच्या कारवाईत एका आरोपीला ताब्यात घेऊन लाखांचा मुद्देमाल जप्त केला आहे.
प्राप्त माहिती नुसार मंगळवार (दि.३) जुन रोजी स्थानिक गुन्हे शाखा नागपुर ग्रामीण पथक अवैध धंध्यावर कन्हान परिसरात पेट्रोलिंग करीत असतांना गुप्त बातमीदारा कडुन माहिती मिळाली कि खंडाळा शिवारातुन अवैध विनापरवाना वाळुची वाहतुक होत आहे . अशा मिळालेल्या माहिती वरुन पथकाने खंडाळा फाटा जवळ नाकाबंदी केली असता टाटा कंपनीचा छोटा हाती वाहन क्रमांक एम एच ४० सीटी ३८५६ हा वाळु वाहतुक करतांनी मिळुन आल्याने पथकाने त्यास थांबवुन वाहनाची पाहणी केली असता वाळु दिसुन आली. वाहन चालक निकेश रघुनाथ पात्रे (वय २८) रा.कन्हान याला वाळु परवाना बाबत विचारले असता त्यांने परवाना नसल्याचे सांगितले . पथकाने वाहन चालकास ताब्यात घेऊन त्याचा जवळुन १/२ ब्रास वाळु किंमत २५०० रुपये आणि टाटा कंपनीचा वाहन किंमत ४,००,००० रुपए असा एकुण ४,०२,५०० रुपयांचा मुद्देमाल जप्त करुन आरोपी विरूद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे . सदर गुन्ह्याचा पुढील तपास पोलीस निरीक्षक राजेंद्र पाटील यांचा मार्गदर्शनात पोलीस उपनिरीक्षक एकनाथ राठोड करीत आहे .
सदरची कारवाई स्थानिक गुन्हे शाखा नागपुर ग्रामीण पोलीस निरीक्षक ओमप्रकाश कोकाटे यांचा मार्गदर्शनात सहायक पोलीस निरीक्षक किशोर शेरकी , एस आय विनोद काळे , पोहवा प्रमोद भोयर , पोना संजय बदोरिया सह आदि कर्मचाऱ्यांनी ही कारवाई यशस्वीरित्या पार पाडली .
कन्हान प्रतिनिधि – ऋषभ बावनकर






Comments are closed