Shopping cart

  • Home
  • Marathi
  • शिक्षक रणजित सिंग डिसले यांचा शिक्षणात नवा प्रयोग; एआयच्या मदतीने उत्तरपत्रिका तपासणी

शिक्षक रणजित सिंग डिसले यांचा शिक्षणात नवा प्रयोग; एआयच्या मदतीने उत्तरपत्रिका तपासणी

May 3, 20251 Mins Read
55

India Morning News

Share News:
Share

अचूकता तब्बल ९५%

मुंबई – ग्लोबल टीचर पुरस्कार विजेते रणजित सिंग डिसले यांनी शिक्षण क्षेत्रात कृत्रिम बुद्धिमत्तेचा (AI) प्रभावी वापर करत एक आगळा-वेगळा प्रयोग साकारला आहे. सोलापूर जिल्हा परिषद शाळेतील २२५ विद्यार्थ्यांच्या अंतिम उत्तरपत्रिका तपासण्यासाठी त्यांनी ‘हॅक द क्लासरूम’ नावाचे एआय मॉडेल तयार केले असून, हे मॉडेल अवघ्या ३२ सेकंदांत उत्तरपत्रिका तपासून निकाल देत आहे.

डिसले यांनी सांगितले की, शिक्षकांना परीक्षेनंतर उत्तरपत्रिका तपासण्यासाठी वेळ अपुरा पडत होता. यामुळे त्यांनी ‘गुगल जेमिनी’च्या मदतीने एआय प्रणाली तयार करून तिची चाचणी केली. २५ ते ३० एप्रिल दरम्यान झालेल्या प्राथमिक प्रयोगात, एआयने उत्तरपत्रिकांची ९५ टक्के अचूक तपासणी केली. मात्र, ५ टक्के उत्तरपत्रिकांमध्ये विद्यार्थ्यांच्या स्वाक्षऱ्या ओळखण्यात अडचण आली. तसेच, २ टक्के प्रश्न चुकीचे नोंदले गेले, असेही त्यांनी नमूद केले.

तुलनात्मक दृष्टिकोनातून पाहता, २० गुणांची उत्तरपत्रिका तपासायला शिक्षकांना सुमारे १ मिनिट ४२ सेकंद लागतात, तर ५० गुणांची उत्तरपत्रिका तपासायला ५ मिनिटे २७ सेकंद लागतात. परंतु एआयने हे काम ३२ सेकंदांत पार पाडले.

या प्रणालीचा आणखी एक वैशिष्ट्यपूर्ण भाग म्हणजे – उत्तरपत्रिकेच्या तपासणीनंतर, AI विद्यार्थ्यांना मिळालेल्या गुणांच्या आधारावर ६ आठवड्यांचा वैयक्तिक अभ्यास आराखडा सुचवते. हा शिक्षण आराखडा १ मे ते १० जून दरम्यान अमलात आणला जाणार आहे.

सध्यातरी सोलापूर जिल्ह्यातील १२ जे.पी. (जिल्हा परिषद शिक्षण विभाग) अंतर्गत हा उपक्रम राबवण्यात येत आहे. या प्रयोगामुळे शिक्षकांना वेळ वाचतो आणि मूल्यांकनात पारदर्शकता येते. विशेष म्हणजे, AI तपासणीमुळे १२ टक्के विद्यार्थ्यांचे गुण पुन्हा पाहण्यात आले आणि संबंधित शिक्षकांचे मूल्यमापन योग्य असल्याचे निष्पन्न झाले.

Share News:
Share

Comments are closed

Related Posts

Share