India Morning News
मुंबई:
भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने (BCCI) इंग्लंडविरुद्ध होणाऱ्या पाच कसोटी सामन्यांच्या मालिकेसाठी भारतीय संघाची अधिकृत घोषणा केली आहे. रोहित शर्मा आणि विराट कोहली यांच्यानंतर टीम इंडियात नव्या युगाची सुरूवात होत असून, आता ‘प्रिन्स ऑफ इंडियन क्रिकेट’ शुबमन गिलकडे कर्णधारपदाची धुरा सोपवण्यात आली आहे. भारताचा ३७ वा कसोटी कर्णधार म्हणून गिलने मान पटकावली असून, या नव्या पर्वाकडून चाहत्यांच्या आणि क्रिकेटविश्वाच्या खूप अपेक्षा आहेत.
या दौऱ्यातून भारत वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपच्या चौथ्या पर्वाला सुरुवात करत असून, कडवे आव्हान स्वीकारण्यासाठी गिल आणि मार्गदर्शक म्हणून निवडण्यात आलेले गौतम गंभीर यांच्यावर लक्ष केंद्रीत आहे.
इंग्लंड दौऱ्याचे वेळापत्रक पुढीलप्रमाणे:
२० जून – पहिली कसोटी, हेडिंग्ले, लीड्स
२ जुलै – दुसरी कसोटी, एजबॅस्टन, बर्मिंगहॅम
१० जुलै – तिसरी कसोटी, लॉर्ड्स, लंडन
२३ जुलै – चौथी कसोटी, ओल्ड ट्रॅफर्ड, मँचेस्टर
३१ जुलै – पाचवी कसोटी, केनिंग्टन ओव्हल, लंडन
शुबमन गिलच्या नेतृत्वाखालील संघ कसोटी क्रिकेटमध्ये कसे प्रदर्शन करतो, हे पाहणे रंजक ठरणार आहे










Comments are closed