Shopping cart

  • Home
  • News
  • मालकाने विकायला आणताच बोकडाचा भावनिक ; मिठी मारून ढसाढसा रडला, पाहणाऱ्यांचे डोळे झाले पाणावले

मालकाने विकायला आणताच बोकडाचा भावनिक ; मिठी मारून ढसाढसा रडला, पाहणाऱ्यांचे डोळे झाले पाणावले

June 7, 20251 Mins Read
33

India Morning News

Share News:
Share

मुंबई :-

प्राण्यांनाही भावना असतात, प्रेमाची ओळख असते आणि माणसाच्या सान्निध्यात त्यांनी आपलेपणाचे नाते जपलेले असते, हे वेळोवेळी सिद्ध होतच असते. सध्या सोशल मीडियावर व्हायरल होणारा एक व्हिडीओ हेच पुन्हा एकदा दाखवून देतोय.

ईदसाठी बाजारात विक्रीसाठी नेलेला एक बोकड आपल्या मालकावर इतका प्रेम करतो की त्याला विकायला नेताच तो भावनाविवश होतो. मालकाच्या गळ्यात पडतो, त्याला मिठी मारतो आणि अक्षरशः हुंदके देत रडायला लागतो. हे दृश्य इतकं हृदयस्पर्शी होतं की उपस्थित लोकही थक्क झाले. अनेकांच्या डोळ्यात अश्रू तरळले.

व्हिडीओ पुन्हा व्हायरल, पण घटना 2022 ची-

सध्या व्हायरल होत असलेला हा व्हिडीओ प्रत्यक्षात 2022 सालचा असून, तो पुन्हा एकदा बकरी ईदच्या पार्श्वभूमीवर सोशल मीडियावर फिरू लागला आहे. बोकडाचा मालकाशी असलेला स्नेह, आपल्यावर येणाऱ्या संकटाची चाहूल आणि त्यावर उमटलेली भावना – हे सारं या काही क्षणांच्या व्हिडीओतून ठळकपणे दिसून येतं.

दरम्यान बोलता न येणाऱ्या प्राण्यांनाही प्रेम, नातं, भीती यासारख्या भावना असतात, यावर या घटनेने ठळक प्रकाश टाकला आहे. केवळ मालकावरचा विश्वासच नव्हे, तर त्याच्याशी असलेली जवळीक आणि अलग होण्याची भीती यामुळे हा बोकड अशा प्रकारे भावनिक झाला असावा, असं म्हणता येईल.

Share News:
Share

Comments are closed

Related Posts

Share