Shopping cart

  • Home
  • News
  • माणुसकीचं सोनं! वृद्ध दाम्पत्याला ज्वेलर्सने दिला अनमोल सन्मान; व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल!

माणुसकीचं सोनं! वृद्ध दाम्पत्याला ज्वेलर्सने दिला अनमोल सन्मान; व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल!

June 17, 20251 Mins Read
37

India Morning News

Share News:
Share

छत्रपती संभाजीनगर :-
सध्या सोशल मीडियावर एक अत्यंत भावनिक आणि प्रेरणादायी व्हिडिओ व्हायरल होत आहे. हा व्हिडिओ आहे छत्रपती संभाजीनगरमधील गोपिका ज्वेलर्स या दागिने दुकानातील. या व्हिडिओत दिसतंय एक वयोवृद्ध जोडपं ९३ वर्षीय आजोबा आणि त्यांची पत्नी जे आपल्या साध्या स्वप्नासाठी दुकानात आले होते.

आजोबांना त्यांच्या पत्नीला सोन्याच्या वाट्या घ्यायच्या होत्या, तिचं जुनं स्वप्न पूर्ण करायचं होतं. पण दोघांकडे फारसे पैसे नसतात. आजींकडे फक्त ११०० रुपये तर आजोबांकडे थोडे पैसे कापडात बांधून आणलेले.

दुकानाचे मालक यावर मन मोठं करून प्रतिक्रिया देतात. ते म्हणतात, “तुमचे प्रेम पाहिलं की सोन्यालाही लाज वाटावी. पैसे नका देऊ, फक्त आशीर्वाद द्या.” मात्र वृद्ध दाम्पत्य आग्रह धरतं, आणि शेवटी ज्वेलर्स फक्त २० रुपये घेऊन दागिना त्यांना देतो.

हा हृदयस्पर्शी व्हिडिओ गोपिका ज्वेलर्सने इन्स्टाग्रामवर शेअर केला असून, त्याला आतापर्यंत तब्बल १७ मिलियनहून अधिक व्ह्यूज मिळाले आहेत. अनेकांनी या घटनेचं भरभरून कौतुक केलं असून, वृद्ध दाम्पत्याचं प्रेम आणि दुकानमालकाने दाखवलेली माणुसकी लोकांच्या मनाला भिडली आहे. या व्हिडिओमुळे पुन्हा एकदा सिद्ध झालं. प्रेम, श्रद्धा आणि करुणा यांची किंमत पैशात मोजता येत नाही.

Share News:
Share

Comments are closed

Related Posts

Share