India Morning News
पुणे: साखर उद्योगातील नावीन्य आणि सहवीजनिर्मितीला प्रोत्साहन देण्यासाठी पुण्यात ‘तिसरा राष्ट्रीय सहवीजनिर्मिती पुरस्कार’ वितरण सोहळा उत्साहात पार पडला.
याप्रसंगी राज्याचे सहकारमंत्री बाबासाहेब पाटील, नॅशनल को-ऑपरेटिव्ह शुगर फॅक्टरी फेडरेशनचे अध्यक्ष हर्षवर्धन पाटील, सकाळ उद्योग समूहाचे प्रमुख प्रतापराव पवार, केंद्रीय सल्लागार डॉ. संगीता कस्तूरे, कोजनरेशन असोसिएशनचे उपाध्यक्ष जयप्रकाश दांडेगांवकर यांच्यासह पुरस्कार विजेते, पत्रकार आणि उद्योग क्षेत्रातील मान्यवर उपस्थित होते.
यावेळी शरद पवार म्हणाले,साखर उद्योगाने ग्रामीण अर्थव्यवस्थेला बळकटी दिली आहे. मोलॅसिसपासून इथेनॉल, टाकाऊ कचऱ्यापासून वीज आणि खतनिर्मिती, तसेच आता हायड्रोजन निर्मितीच्या दिशेने उद्योगाची वाटचाल सुरू आहे. मात्र, कमी होणारा गळीत हंगामाचा कालावधी साखर उद्योगाच्या अर्थशास्त्राला आव्हान देत आहे. यंदा साखरेसाठी चांगले दर आणि निर्यातीच्या संधींमुळे उद्योगाला दिलासा मिळाला आहे.
नवीन उत्पादने आणि नुकसानभरपाईच्या उपाययोजनांमुळे उद्योग अधिक मजबूत होईल, असे मत मान्यवरांनी व्यक्त केले.भारताच्या ग्रामीण भागातील वीज मागणी आणि विकेंद्रित ऊर्जेचे महत्त्व लक्षात घेता, बॅगास आधारित सहवीजनिर्मितीला प्रोत्साहन देण्याची गरज आहे.
बॅगासला कृषी बायोमास म्हणून मान्यता द्यावी, अशी मागणी यावेळी करण्यात आली. पुरस्कार विजेत्यांचे अभिनंदन करत, राष्ट्रीय जैव-ऊर्जा अभियानाला बळकटी देण्यासाठी ठोस धोरणांची आवश्यकता असल्याचे सांगण्यात आले.










Comments are closed