Shopping cart

  • Home
  • News
  • प्रगती अभियान व स्पर्धेत तृतीय पुरस्कार मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते जिल्हाधिकारी विपीन इटनकर यांना प्रदान

प्रगती अभियान व स्पर्धेत तृतीय पुरस्कार मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते जिल्हाधिकारी विपीन इटनकर यांना प्रदान

April 21, 20251 Mins Read
50

India Morning News

Share News:
Share

नागपूर, दि. 21: मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते आज जिल्हाधिकारी जिल्हाधिकारी डॉ विपिन इटनकर यांना आज राजीव गांधी प्रशासकीय गतिमानता (प्रगती) अभियान स्पर्धेतील राज्यस्तरीय “सर्वोत्कृष्ट कल्पना/उपक्रम-शासकीय अधिकारी” या प्रकारात दवाखाना आपल्या दारी उपक्रमासाठी तृतीय पारितोषिक देवून गौरविण्यात आले.

राजीव गांधी प्रशासकीय गतीमानता अभियान व स्पर्धा सन 2024-25चे पुरस्कार मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे हस्ते आज सह्याद्री राज्य अतिथीगृह सभागृहात प्रदान करण्यात आले. यावेळी कौशल्य, रोजगार, उद्योजकता व नाविन्यता मंत्री मंगलप्रसाद लोढा व राज्याच्या मुख्य सचिव सुजाता सौनिक यांची उपस्थिती होती.

प्रशासन लोकाभिमुख करणे, त्यात निर्णयक्षमता आणणे आणि सर्वांच्या सहकार्यातून उत्तम प्रशासन कार्यान्वीत करण्यासाठी वर्ष 2024-25 या वर्षात राज्यस्तरावर तसेच तालुका, जिल्हा, विभागीय स्तरावर व महानगरपालिका स्तरावर “राजीव गांधी प्रशासकीय गतिमानता (प्रगती) अभियान” राबविण्यात आले. या सर्व पुरस्कार विजेत्या संस्था व अधिकाऱ्यांना पुरस्कार रकमेचा उपयोग कार्यालयांच्या सुधारणेसाठी तसेच स्पर्धेत पाठविण्यात आलेल्या उपक्रमांच्या उत्कृष्ट अंमलबजावणीसाठी करण्यात येणार आहे.

Share News:
Share

Comments are closed

Related Posts

Share