Shopping cart

  • Home
  • Sports
  • हा विजय भारतीय सैन्याला समर्पित; पाकिस्तानला पराभूत केल्यानंतर सूर्यकुमार यादवचे विधान

हा विजय भारतीय सैन्याला समर्पित; पाकिस्तानला पराभूत केल्यानंतर सूर्यकुमार यादवचे विधान

September 15, 20251 Mins Read
149

India Morning News

Share News:
Share

मुंबई: दुबईच्या आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्टेडियमवर झालेल्या आशिया चषकातील रोमांचक सामन्यात भारताने पाकिस्तानवर ७ गडी राखून भक्कम विजय मिळवला. भारताचा कर्णधार सूर्यकुमार यादव (Suryakumar Yadav) केवळ फलंदाजीतच नाही तर सामन्यानंतरच्या भावनिक विधानामुळेही देशवासीयांच्या हृदयात घर करून गेला. त्याने हा विजय थेट भारतीय सैन्याला समर्पित केला.

पाकिस्तानचा निस्तेज डाव
टॉस जिंकून प्रथम फलंदाजीला उतरलेल्या पाकिस्तानला भारतीय गोलंदाजांनी सुरुवातीपासूनच जखडून ठेवले. २० षटकांच्या खेळीत पाकिस्तानने ९ बाद १२८ धावा केल्या. साहिबजादा फरहानने सर्वाधिक ४० तर शाहीन आफ्रिदीने ३३ धावांचे योगदान दिले.

भारताचा विजयी पाठलाग
भारताकडून अभिषेक शर्माने (Abhishek Sharma) सुरुवातीला जबरदस्त फटकेबाजी केली. त्याने शाहीन आफ्रिदीच्या पहिल्याच षटकात चौकार-षटकार ठोकत १३ चेंडूत ३१ धावा ठोकल्या. शुभमन गिलने १० आणि तिलक वर्माने ३१ धावांचे योगदान देत डावाला गती दिली.

सूर्याची विजयी खेळी आणि भावनिक संदेश
तिसऱ्या विकेटसाठी तिलक वर्मा आणि सूर्यकुमार यादव यांनी ५६ धावांची भागीदारी रचली. अखेरीस सूर्यानं ३७ चेंडूत नाबाद ४७ धावा ठोकत षटकारासह भारताला विजय मिळवून दिला. सामन्यानंतर तो म्हणाला, “हा विजय आम्ही देशाच्या शूर सैन्याला आणि पहलगाम दहशतवादी हल्ल्यातील शहीद जवानांच्या कुटुंबीयांना अर्पण करतो. त्यांच्या त्यागामुळेच आम्ही सुरक्षित आहोत.”

विशेष म्हणजे नाणेफेक झाल्यानंतर सूर्यानं पाकिस्तान कर्णधाराशी हस्तांदोलन टाळलं. सामना संपल्यानंतरही तो आणि शिवम दुबे थेट ड्रेसिंग रूमकडे गेले. बाकी खेळाडूंनी मैदानावरच जल्लोष केला, तर पाकिस्तानी खेळाडू हस्तांदोलनासाठी वाट पाहत राहिले.

भारतीय गोलंदाजांची भेदक कामगिरी
कुलदीप यादवने ४ षटकांत १८ धावा देत ३ गडी बाद केले. अक्षर पटेलने २ तर बुमराह, हार्दिक पांड्या आणि वरुण चक्रवर्ती यांनी प्रत्येकी १ बळी घेतला. त्यांच्या माऱ्यामुळे पाकिस्तानचा डाव पूर्णपणे ढासळला आणि भारताने सहज विजय मिळवला.

Share News:
Share

Comments are closed

Related Posts

Share