Shopping cart

  • Home
  • News
  • वेकोलि सुरक्षा रक्षकाची हत्या करणाऱ्या तीन आरोपीला अटक

वेकोलि सुरक्षा रक्षकाची हत्या करणाऱ्या तीन आरोपीला अटक

May 25, 20251 Mins Read
749

India Morning News

Share News:
Share

चार मोबाइल जप्त , स्थानिक गुन्हे शाखा नागपुर ग्रामीण पथकाची कारवाई

कन्हान : – कन्हान वेकोलि अंतर्गत कामठी उपक्षेत्रातील एकीकृत इंदर कामठी डीप ओपन कास्ट माइन्स मध्ये काम करणारा सुरक्षा रक्षक किशोर सूर्यवंशीची हत्या करणाऱ्या तीन आरोपीला स्थानिक गुन्हे शाखा नागपुर ग्रामीण पथकाने मध्यप्रदेशातुन अटक केली.

रविवार (दि.४) मे रोजी रात्री १२ वाजता च्या दरम्यान किशोर सूर्यवंशी (वय २९) रा.मडीबाबा काॅलोनी खदान नंबर तीन हा ड्युटीवरुन दुचाकी वाहन क्रमांक एम.एच ४० ए.वाय २३७७ ने घरी जात असतांना शिवगिरी शाळेजवळ उभ्या असलेल्या ट्रकच्या मागे लपलेल्या हल्लेखोरांनी किशोर ला थांबवुन त्याच्या डोक्यावर दारुच्या बाॅटलने आणि काठीने प्राणघातक हल्ला केला. किशोरच्या डोक्याला जबर मार बसल्याने तो रक्ताच्या थारोळ्यात तिथेच पडला व हल्लेखोर पळून गेले . काही वेळाने वेकोलि एमएसएफ सुरक्षा कर्मचारी सूरज ब्राह्मणवाडे आणि कृणाल गिरे यांना किशोर रक्तबंबाळ स्थितीत पडलेला दिसला . त्यांनी त्याला वेकोलिच्या जे.एन. रुग्णालयात नेले , मात्र प्रकृती गंभीर असल्याने किशोरला कामठीतील एका खाजगी रुग्णालयात हलविण्यात आले . तिथे त्याच्या डोक्यावर शस्त्रक्रिया करण्यात आली . उपचार सुरु असतांना मंगळवार (दि.२०) मे रोजी सकाळी १० वाजता च्या दरम्यान त्याचा मृत्यु झाला . किशोरच्या मृत्यु नंतर नागपुर ग्रामीण पोलीस अधिक्षक हर्ष पोद्दार यांनी घटनेची गांभीर्याने दखल घेत स्थानिक गुन्हे शाखा नागपुर ग्रामीण पथक पोलीस निरीक्षक ओमप्रकाश कोकाटे आणि पथकाला योग्य मार्गदर्शन करुन गुन्हा उघडकीस आणण्याचे आदेश दिले . स्थानिक गुन्हे शाखा नागपुर ग्रामीण पथक शनिवार (दि.२४) मे रोजी सदर गुन्ह्याच्या समांतर तपास करीत असतांना तांत्रिक विश्लेषण व गुप्त बातमीदाराकडून मिळालेल्या माहितीच्या आधारे गुन्ह्यातील आरोपी १) सचिन कन्हैयालाल रायपुरे (वय २४) वर्ष रा. पाताखेडा ता.सारणी,जि. बैतूल , २)कौशल मधुसूदन रायपुरे , (वय ३२) वर्ष रा.दिघावानी,छिंदवाडा , ३) पियुष धर्मदास बघेल , (वय २०) वर्ष,रा.दिघावानी,छिंदवाडा
यांना सारणी जिल्हा बैतूल व छिंदवाडा येथून ताब्यात घेतले . आरोपी कडुन चार मोबाइल जप्त करुन सखोल विचारपूस केली असता त्यांनी गुन्हा केल्याची कबुली दिली असता पोलीसांनी आरोपीतांना ताब्यात घेऊन पुढील कारवाई आणि तपास करणे कामी कन्हान पोलीसांना सौपविण्यात आले .
सदरची कारवाई नागपुर ग्रामीण पोलीस अधिक्षक हर्ष पोद्दार , अप्पर पोलीस अधिक्षक रमेश धुमाळ , स्थानिक गुन्हे शाखा नागपुर ग्रामीण पथक पोलीस निरीक्षक ओमप्रकाश कोकाटे यांचा मार्गदर्शनात सहायक पोलीस निरीक्षक किशोर शेरकी , आशिष सिंग ठाकुर , मनोज गदादे , सहायक फौजदार विनोद काळे , प्रमोद भोयर , शैलेश यादव , संजय बदोरिया , सतीश राठोड सह आदि पोलीस कर्मचारी यांनी ही कारवाई यशस्वीरित्या पार पाडली .

२८ मे पर्यंत आरोपींचे पीसीआर

वेकोलि सुरक्षा रक्षक किशोर सूर्यवंशी हत्या प्रकरणात तीन आरोपींना अटक करण्यात आली आहे. कन्हान पोलिसांनी शनिवारी (दि. २४) मे रोजी कामठी न्यायालयात त्यांना हजर केले असता २८ तारखेपर्यंत पीसीआर मिळाला . सदर घटनेचा पुढील तपास कन्हान पोलीस करत आहेत.

संशयित आरोपीला सोडण्यात आले

रविवार (दि.४ मे) रोजी रात्री १२ वाजता च्या दरम्यान वेकोलि सुरक्षा रक्षक किशोर सूर्यवंशी यांच्यावर प्राणघातक हल्ला झाला . हल्ल्या नंतर त्यांच्यावर कामठी येथील एका खाजगी रुग्णालयात उपचार सुरू होते, जिथे उपचारा दरम्यान त्यांचा मृत्यू झाला. कन्हान पोलिसांनी हत्याचा गुन्हा दाखल करून आरोपींचा शोध सुरू केला. संशयित आणि मोबाईल लोकेशनच्या आधारे पोलिसांनी रज्जन सुरेश प्रजापती (वय १९) रा.सुखदेव कॉलनी, कांद्री याला अटक केली होती. शनिवारी (दि. २४) कामठी न्यायालयात हजर केल्यानंतर पोलिसांनी त्याला सोडून दिले.

Share News:
Share

Comments are closed

Related Posts

Share