Shopping cart

  • Home
  • News
  • नागपुरात ‘ऑपरेशन थंडर’अंतर्गत मानकापूरात एमडी पावडरसह तिघांना अटक, एक फरार!

नागपुरात ‘ऑपरेशन थंडर’अंतर्गत मानकापूरात एमडी पावडरसह तिघांना अटक, एक फरार!

November 11, 20251 Mins Read
127

India Morning News

Share News:
Share

– ड्रग्जविरोधी मोहिमेला वेग, पोलिसांची मोठी कारवाई

नागपूर : शहरात सुरू असलेल्या ‘ऑपरेशन थंडर’ अंतर्गत अंमली पदार्थविरोधी पथकाने पुन्हा एकदा मोठी कारवाई करत मानकापूर परिसरातून एमडी पावडरचा मोठा साठा उघडकीस आणला. पहाटेच्या सुमारास राज अपार्टमेंटसमोर, इलेक्शन हॉस्पिटलच्या मागे पोलिसांनी छापा टाकून तिघा संशयितांना अटक केली, तर एक आरोपी फरार आहे.

या कारवाईत पोलिसांनी ५२ ग्रॅम एमडी पावडर, तीन मोबाईल, एक महिंद्रा स्कॉर्पिओ आणि एक एक्टिवा मोपेड असा एकूण १६ लाख २५ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे.

अटक करण्यात आलेल्या आरोपींमध्ये नबाब तोही जमशेद खान (३१), आयुष अमृत मेश्राम (२१) आणि रोहित रवींद्र सिंग (२६) यांचा समावेश आहे. तर त्यांचा साथीदार शहाणा वाजे उर्फ पक्या मोहम्मद आरिफ हा सध्या फरार असून, त्याच्या शोधासाठी पोलिसांच्या विशेष पथकांकडून सापळा रचण्यात आला आहे.

गस्ती दरम्यान पोलिसांना हे युवक वाहनाजवळ संशयास्पद हालचाल करताना दिसले. तात्काळ पंचांच्या उपस्थितीत झडती घेतल्यावर त्यांच्या ताब्यातून एमडी पावडर सापडली. त्यानंतर पोलिसांनी पंचनामा करून अंमली पदार्थ नियंत्रण कायद्यानुसार (NDPS Act) गुन्हा दाखल केला आहे.

या धडक कारवाईमुळे नागपूर पोलिसांच्या अंमली पदार्थविरोधी मोहिमेला नवीन गती मिळाली आहे. शहरातील ड्रग्ज नेटवर्कच्या मोठ्या साखळीचा धागा पोलिसांना या तपासातून मिळण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.‘ऑपरेशन थंडर’अंतर्गत पोलिसांची ही कारवाई नागपूरच्या गुन्हेगारी जगतात खळबळ माजवणारी ठरली असून, अशा धाडीमुळे शहरातील ड्रग्ज माफियांना मोठा आळा बसणार आहे, असे पोलिस सूत्रांनी सांगितले.

 

Share News:
Share

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Related Posts

Share