Shopping cart

  • Home
  • News
  • तुमसर नगरपरिषद प्रभाग आरक्षण सोडत: महिलांसाठी ‘या’ जागा आरक्षित

तुमसर नगरपरिषद प्रभाग आरक्षण सोडत: महिलांसाठी ‘या’ जागा आरक्षित

October 8, 20251 Mins Read
Tumsar Municipal Council
43

India Morning News

Share News:
Share

२५ सदस्यीय नगरपालिकेत १३ महिला व १२ पुरुष सदस्य राहणार

प्रभाग क्रमांक १० मध्ये तीन नगरसेवक राहणार
उर्वरित ११ प्रभागातून २२ नगरसेवक निवडले जाणार

तुमसर : आगामी तुमसर नगरपरिषद निवडणुकीसाठी बहुप्रतिक्षित प्रभाग आरक्षण सोडत बुधवारी दिनांक ८ ऑक्टोबर रोजी नगरपालिका सभागृहात पार पडली. या सोडतीमध्ये महिलांसाठीच्या आरक्षित जागांची यादी जाहीर करण्यात आली आहे, ज्यामुळे स्थानिक राजकारणात आता खऱ्या अर्थाने हालचालींना वेग येणार आहे. या आरक्षण सोडतीमुळे अनेक विद्यमान नगरसेवकांना धक्का बसला असून, इच्छुकांनी निवडणुकीच्या तयारीला सुरुवात केली आहे.

आरक्षणाची प्रमुख वैशिष्ट्ये : नगरपरिषद प्रशासनाने जाहीर केलेल्या यादीनुसार, एकूण १२ प्रभागांमध्ये अनुसूचित जाती महिला राखीव प्रभाग १ व प्रभाग क्रमांक ११, नामाप्र महिला प्रभाग क्रमांक ७,९,१०,१२, सर्वसाधारण महिला प्रभाग क्रमांक २,३,४,५,६,८,१० यांच्या समावेश आहे. अनुसूचित जाती करिता प्रभाग क्रमांक २,३, अनुसूचित जमाती करिता प्रभाग क्रमांक ६ राखीव करण्यात आले आहेत.सर्वसाधारण प्रवर्गा करिता प्रभाग क्रमांक १,७,९,१०,११,१२ राखीव झाले आहेत. नामप्र महिला करिता प्रभाग क्रमांक ७,९,१० व १२ राखीव झाले आहेत.

प्रभाग क्रमांक १० मध्ये तीन नगरसेवक निवडून येणार असून त्यात नामाप्र महिला सर्व महिला व सर्वसाधारण सदस्यांच्या समावेश राहणार आहे. उर्वरित ११ प्रभागात दोन सदस्य निवडून येणार आहेत. तुमसर नगरपालिकेत एकूण यावेळी २५ सदस्य राहणार असून दोन सदस्य हे नामनिर्देशित केले जाणार आहेत. २०१७ मध्ये झालेल्या निवडणुकीत येथे नगरसेवकांची संख्या ही २३ इतकी होती.

राजकीय चित्र बदलणार : या सोडतीमुळे अनेक प्रभागातील राजकीय समीकरणे पूर्णपणे बदलणार आहेत. येथे काही विद्यमान व माजी नगरसेवकांना धक्का बसला आहे. ज्या प्रभागात इच्छुक पुरुष उमेदवारांची जागा महिलांसाठी आरक्षित झाली आहे. त्या ठिकाणी आता पत्नीला किंवा घरातील अन्य महिलेला उमेदवारी देण्याच्या पर्याय राजकीय पक्षाकडून वापरला जाण्याची शक्यता आहे. प्रभाग क्रमांक दहा मध्ये नामाप्र महिला, सर्वसाधारण महिला व सर्वसाधारण असे आरक्षण असल्याने या प्रभागात मोठी चुरस पाहायला मिळू शकते. आरक्षण सोडतीनंतर राजकीय पक्षाकडून आता इच्छुकांचे सर्वेक्षण आणि नव्या उमेदवारांची चाचापली सुरू झाली आहे लवकरच नगरपरिषद निवडणुकीच्या संपूर्ण कार्यक्रम जाहीर होण्याची शक्यता असून तुमसर शहरात निवडणुकीचे वातावरण तापण्यास सुरुवात झाली आहे.

 

Share News:
Share

Comments are closed

Related Posts

Share