Shopping cart

  • Home
  • News
  • अवैधरित्या रेतीची वाहतुक करणारे दोन टिप्पर ट्रक पकडले

अवैधरित्या रेतीची वाहतुक करणारे दोन टिप्पर ट्रक पकडले

June 1, 20251 Mins Read
217

India Morning News

Share News:
Share

दोन आरोपी अटक , एक कोटींचा मुद्देमाल जप्त

पोलीस अधिक्षक, नागपुर ग्रामीण जिल्हा यांचा विशेष पथकाची मोठी कारवाई

कन्हान : – नागपुर ग्रामीण पोलीस अधिक्षक हर्ष पोद्दार यांचा विशेष पथकाने कन्हान पोलीस स्टेशन हद्दीत अवैधरित्या रेतीची वाहतुक करणारे दोन टिप्पर ट्रक पकडले . कारवाईत दोन आरोपींना अटक करुन १ कोटी ११ लाख १० हजारांचा मुद्देमाल जप्त केला आहे .

प्राप्त झालेल्या माहिती नुसार शनिवार (दि.३१) मे रोजी पोलीस अधिक्षक , नागपुर ग्रामीण जिल्हा यांचा विशेष पथक कन्हान परिसरात अवैध धंद्यावर कारवाई करणे कामी पेट्रोलिंग करीत असतांना गुप्त बातमीदारा कडुन माहिती मिळाली कि मनसर कडुन कन्हान मार्गे अवैधरित्या विनापरवाना रेतीची चोरटी वाहतुक केली जात आहे . अश्या मिळालेल्या माहितीच्या आधारे पोलीस अधिक्षकांच्या विशेष पथकाने हायवे रोडवर कुंभलकर धाब्याजवळ नाकाबंदी केली असता संशयित वाहन १६ चक्का ट्रक क्रमांक एम एच ३४ बी जेड २००४ आणि १२ चक्का ट्रक क्रमांक एम एच ४० बी एफ ९०८६ असे दोन ट्रक मिळुन आले . वाहन थांबवुन पाहणी केली असता ट्रक मध्ये मोठ्या प्रमाणात रेती आढळुन आली . वाहन चालक अक्षय सुरेश पाटील (वय ३३) वर्ष रा. कोराडी , रविंद्र रामा भलावी (वय ३५) वर्ष रा.रेटी खवासा , ता.कुरई , जि.सिवनी यांना रेती परवाना बाबत विचारले असता त्यांनी आमच्या कडे परवाना नसल्याचे सागिंतले . पोलीसांनी दोन्ही वाहन चालकांना अटक करुन त्याचा जवळुन २२ ब्रास रेती किंमत १ लाख १० हजार रुपए आणि दोन टिप्पर ट्रक किंमत १ कोटी १० लाख रुपए असा एकुण १ कोटी ११ लाख , १० हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करुन दोन्ही आरोपी विरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे . सदर गुन्ह्याचा पुढील तपास पोलीस निरीक्षक राजेंद्र पाटील यांचा मार्गदर्शनात कन्हान पोलीस करीत आहे .

सदरची कारवाई नागपुर ग्रामीण पोलीस अधिक्षक हर्ष पोद्दार , स्थानिक गुन्हे शाखा पोलीस निरीक्षक ओमप्रकाश कोकाटे यांचा मार्गदर्शनात सहायक पोलीस निरीक्षक किशोर शेरकी , परमेश्वर मुरकुटे , धीरज गभणे , प्रवीण ठवकर , श्याम सिनकर , भागवत गुट्टे सह आदि पोलीस कर्मचारी यांनी ही कारवाई यशस्वीरित्या पार पाडली .

कन्हान प्रतिनिधि – ऋषभ बावनकर

Share News:
Share

Comments are closed

Related Posts

Share