India Morning News
कन्हान : – कन्हान पोलीस स्टेशन अंतर्गत नागपुर – जबलपुर बायपास रोड वरील बोर्डा टोल नाका जवळील डिवाईन रेस्टारेंट जवळ भरधाव कारच्या धडकेत गंभीर जख्मी झालेल्या दुचाकी वाहन चालकाचा उपचारा दरम्यान मृत्यु झाल्याने गुन्ह्यात कलम वाढ करण्यात आली आहे .
शनिवार (दि.१४) जुन रोजी सकाळी १०:३० दरम्यान रतिप गंगाधर शेंडे (३४) रा.खंडाळा घटाटे कन्हान यांचा भाऊ किरण गंगाधर शेंडे (३८ ) रा.खंडाळा घटाटे कन्हान हे दुचाकी वाहन क्रमांक एम एच ४० टी ४२९७ ने बोर्डा टोल नाका जवळील डिवाईन रेस्टारेंट कडुन कामासाठी जात होते . नागपुर – जबलपुर बायपास मार्गाने जबलपुर कडे जाणाऱ्या कार वाहन क्रमांक टीसीओ ८ ईपी १००१ च्या चालकाने आपल्या ताब्यातील वाहन भरधाव वेगाने आणि निष्काळजी पणाने चालवुन दुचाकी वाहना ला मागुन जोरदार धडक दिली . या धडकेत दुचाकी वाहन चालक किरण शेंडे याचा डोक्याला व पायाला मार लागुन गंभीर जख्मी झाला होता . घटनेची माहिती कन्हान पोलीसांना मिळताच पोलीसांनी घटनास्थळी पोहचुन जख्मीला नागपुर मेडिकल येथील रुग्णालयात उपचार करीता दाखल केले होते . बुधवार (दि.१८) जुन रोजी पहाटे सकाळी ४ वाजता उपचारा दरम्यान डाॅक्टरांनी तपासुन मृत घोषित केले . त्यांची अंतिम यात्रा दुपारी २ वाजता काढुन खंडाळा घाटंवर अंतिम संस्कार करण्यात आले . कन्हान पोलीसांनी गुन्ह्यात कलम वाढ करुन पुढील तपास पोलीस निरीक्षक राजेंद्र पाटील यांचा मार्गदर्शनात कन्हान पोलीस करीत आहे .










Comments are closed